Agriculture Degree Courses च्या प्रवेश अटी शिथिल; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

237
Agriculture Degree Courses च्या प्रवेश अटी शिथिल; हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
  • प्रतिनिधी

राज्यातील कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आता किमान ४५ टक्के, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण आवश्यक राहणार आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. (Agriculture Degree Courses)

या संदर्भात माहिती देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, “इच्छुक विद्यार्थी कृषी शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहू नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.” महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११८वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. (Agriculture Degree Courses)

(हेही वाचा – Ind vs Eng, 4th Test : ‘स्वर्गातून क्रिकेटसाठी पाठवलेला माणूस,’ असं रवी शास्त्री कुणाविषयी म्हणाले?)

सध्याच्या नियमांनुसार, बीएस्सी (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी. टेक कृषी अभियांत्रिकी, अत्रशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि सामुदायिक विज्ञान या ९ पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इ.१२ वी (विज्ञान) मध्ये ५० टक्के गुणांची अट होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना ही अट पूर्ण करता न आल्याने ते प्रवेशापासून वंचित राहत होते. (Agriculture Degree Courses)

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची दारे उघडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रवेश अर्जाची अंतिम मुदत २७ जुलै २०२५ पर्यंत असून विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. (Agriculture Degree Courses)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.