Raj Thackeray : यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; भाषावाद, हिंसाचार, एफआयआरसाठी मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

168
Raj Thackeray : यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; भाषावाद, हिंसाचार, एफआयआरसाठी मागणी
Raj Thackeray : यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; भाषावाद, हिंसाचार, एफआयआरसाठी मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. घनश्याम दयाळू उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून, महाराष्ट्र सरकार, निवडणूक आयोग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना पक्षकार करण्यात आले आहे.(Raj Thackeray)

या याचिकेत काय म्हटलं?

याचिकेत म्हटले आहे की, राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांवर सातत्याने हिंसाचार करतात. ते भाषेच्या आधारावर राजकारण करतात, जे भारतीय संविधानाच्या मूळ भावनेविरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

(हेही वाचा – ‘विशेष प्रकरणांसाठी नवी न्यायालये हवीत’ ; Supreme Court ने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला फटकारले)

ललिता कुमारी प्रकरणाचा उल्लेख

उपाध्याय यांनी ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. या निर्णयात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले होते की, जर एखादा दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर त्यांनी तात्काळ एफआयआर दाखल करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास, हे पोलिसांचे कायदेशीर आणि संविधानिक कर्तव्यभंग ठरेल आणि अशा पोलिसांवर कारवाई केली जाईल, असे निर्देश दिले होते.(Raj Thackeray)

देशभर अंमलबजावणीची मागणी

याचिकेत ललिता कुमारी प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वांची देशभर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगालाही या तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.(Raj Thackeray)

(हेही वाचा – Mumbai Local : अभियांत्रिकी व देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर ‘या’ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार)

सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप आवश्यक

याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करून महाराष्ट्र सरकार आणि या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य त्या कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.(Raj Thackeray)

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.