Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प ठरले अमेरिकेतील दुसरे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष

Donald Trump : क्वांटस इनसाईटने हे सर्वेक्षण केलं आहे.

143
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प ठरले अमेरिकेतील दुसरे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा जगातील शक्तिमान नेता मानला जातो. सध्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मिळालेल्या बहुमतामुळे अधिक आक्रमक झाले आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या आपल्या धोरणाअंतर्गत स्थानिक जनतेला रोजगार मिळावा असं त्यांचं धोरण आहे. शिवाय देशात वित्त पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी फेडरल बँकेलाही त्यांनी रेपोदर कपातीसाठी धारेवर धरलं आहे. यामुळे देशात महागाई वाढेल असं म्हणत अमेरिकेतील काही जनता या धोरणाला विरोधही करते. पण, ताज्या एका सर्वेक्षणानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना २१ शतकातील लोकप्रिय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या यादीत दुसरं स्थान मिळालं आहे.

३० जून ते २ जुलै दरम्यान क्वांटस इनसाईट्सने हे सर्वेक्षण केलं आणि यात १,००० हून जास्त लोकांनी मतदान केलं. या सर्वेक्षणानुसार, बराक ओबामा हे अमेरिकन जनतेचे सगळ्यात लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांना ४७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर त्यांच्या खालोखाल ३७ टक्के पसंती ही डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मिळाली आहे. जॉर्ज डब्ल्यू बुश यांना १२ टक्के लोकांची मतं मिळाली आहेत. ट्रम्प यांच्या आधीचे जो बायडेन यांना ४ टक्के मतं मिळाली.

(हेही वाचा – उपमुख्यमंत्री Eknath Shinde पंढरपूर दौऱ्यावर; वारीपूर्व तयारीचा घेतला आढावा)

क्वान्टस इनसाईट्स ही संस्था अमेरिकेतील उजव्या विचारसरणीची संस्था आहे. संस्थेचा कल रिपब्लिकन पक्षाकडेच आहे. पण, अमेरिकन निवडणुकीच्या वेळी दोलायमान राज्यांमध्ये या संस्थेनं केलेलं सर्वेक्षण अचूक ठरलं होतं. शिवाय २०२४ मध्ये ही संस्था सगळ्यात मौल्यवान सर्वेक्षण संस्था ठरली होती.

नुकतेच ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण केले. त्यानिमित्ताने अमेरिकेत झालेल्या काही सर्वेक्षणांत ट्रम्प यांची विश्वासार्हता आणि लोकप्रियता ढळत असल्याचं दिसून आलं होतं. त्या तुलनेत हे सर्वेक्षण ट्रम्प आणि त्यांच्या पाठीराख्यांना सुखावणारं आहे. शिवाय अमेरिकन लोकांचं मन आणि मत सतत दोलायमान असल्याचं या सर्वेक्षांमधून दिसून आलं आहे. कारण, त्यांचा कल सतत बदलता आहे.

(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah पुणे दौऱ्यावर; असं असेल नियोजन)

क्वांटसने केलेल्या सर्वेक्षणात बराक ओबामांना महिला, कृष्णवर्णीय, पधवीधर विद्‌यार्थी आणि तरुणांचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे. तर ट्रम्प (Donald Trump) यांना रिपब्लिकन पाठिंबा आहे आणि अमेरिकेतील वृद्ध समाज त्यांच्या बाजूने असलेला दिसतोय. हे सर्वेक्षण बाहेर आलं असतानाच मॉर्निंग कन्सल्टंटस संस्थेनं केलेल्या एका जागतिक पाहणीत डोनाल्ड ट्रम्प यांना जागतिक नेता म्हणूनही खास लोकप्रियता मिळाली आहे. इथं त्यांचा क्रमांक सातवा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.