Bangladeshi Infiltrators : मुंबई पोलिसांच्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची विमानाने मायदेशात रवानगी

180
Bangladeshi Infiltrators : मुंबईतील खासदाराच्या प्रश्नाने उघडकीस आला धक्कादायक अहवाल
  • प्रतिनिधी 

मुंबईतून ताब्यात घेतलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात येत आहे. मुंबईतून जवळपास एका महिन्यात ३५० महिला आणि पुरुष बांगलादेशी नागरिकांची बांगलादेशात रवानगी करण्यात आली आहे. या घुसखोर बांगलादेशी नागरिकांना पुण्यातून खास विमानातून बांगलादेशात रवाना करण्यात येत आहे. मुंबईसह राज्यभरात घुसखोर बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल न करता कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठवले जात आहे. मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यात ताब्यात घेतलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांची बांगलादेशात रवानगी सुरु केली आहे. (Bangladeshi Infiltrators)

(हेही वाचा – Asiatic Lions : गावात दररोज सिंह, बिबटे येतात; परिसरातील लोक कसं जीवन जगतात?, वाचा संपूर्ण बातमी)

मुंबई, ठाणे, नविमुंबई येथून ताब्यात घेण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशींची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित पोलीस आयुक्तालयातच्या हद्दीतील बांगलादेशी नागरिकांना एकत्र करून त्यांना प्रथम रस्ते मार्गाने पुण्यातील लोहगाव विमानतळ येथे आणले जाते. तेथून त्यांना विशेष विमानाने बांगलादेश सीमेवर आणून सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्या ताब्यात दिले जाते. तेथून या बांगलादेशीना त्यांच्या बांगलादेशात रवाना करण्यात येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. बुधवारी पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील भातान बोगद्यात झालेल्या पोलिस वाहनांच्या ताफ्याला झालेला अपघातात जखमी झालेले पोलिस पथक हे घुसखोर बांगलादेशी नागरिकांना पुणे येथे घेऊन जात होते. त्यात १६० बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक होते. पोलिस ताफ्यात झालेल्या अपघातात १९ पोलिस कर्मचारी आणि १२ बांगलादेशी जखमी झाले होते. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.