Vivo T4 Ultra : विवोच्या नवीन स्मार्टफोनमध्ये आहे तगडी बॅटरी आणि फ्लॅगशिप फोनसह मिळतील ‘हे’ फिचर्स

Vivo T4 Ultra : विवोच्या टी सीरिजमधील हा ५० मेगापिक्सेलचा पेरिस्कोप लेन्सचा कॅमेरा आहे. 

26
Vivo T4 Ultra : विवोच्या नवीन स्मार्टफोनमध्ये आहे तगडी बॅटरी आणि फ्लॅगशिप फोनसह मिळतील 'हे' फिचर्स
  • ऋजुता लुकतुके

विवो कंपनीने किफायतशीर दरांत सगळे स्मार्ट फिचर असलेले फोन आणून आशियाई बाजारपेठेत क्रांती केली आहे. पुढे त्यांच्या रणनीतीवर आधारित कितीही मोबाईल कंपन्या निघाल्या तरी विवोनं आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे. आता विवो आपल्या टी३ या फोनची पुढची पिढी म्हणजे टी४ अल्ट्रा बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. तगडी बॅटरी आणि ५० मेगा पिक्सेलचा पेरिस्कोप लेन्स असलेला फोन ही फोनची मोठी वैशिष्ट्य असणार आहेत. (Vivo T4 Ultra)

(हेही वाचा – Jio World Centre : मुकेश अंबानींच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नेमकं काय काय आहे? आतून हे सेंटर किती मोठं आहे?)

३४ हजार रुपयांच्या दरम्यानची किंमत, ७,३०० एमएएच क्षमतेची तगडी बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन सातव्या पिढीतील प्रोसेसर यामुळे हा फोन सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार हे नक्की आहे. सध्या फ्लिपकार्टवर या फोनसाठी ४,००० रुपयांची सवलतही सुरू आहे. ८ जीबी ते १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी तसंच २५६ जीबींचं स्टोरेज असे विविध पर्याय तुम्ही निवडू शकाल. साधारण ३४,००० रुपयांपासून त्याची किंमत सुरू होईल. फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ७,३०० एमएएच क्षमतेची बॅटरी हेच असेल. आयक्यूओओ नंतर इतकी मोठी बॅटरी लाँच करणारी विवो ही पहिली भारतीय कंपनी असेल. आधीच्या टी३ मध्ये ५,००० एमएएच बॅटरी असताना नवीन फोनमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा बदल आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये येईल ९० डब्ल्यू क्षमतेचा फास्ट चार्जर. त्यामुळे शून्य ते ५५ टक्के चार्जिंग फक्त ३० मिनिटांत होऊ शकेल. (Vivo T4 Ultra)

(हेही वाचा – Shiv Sena Vardhapan Din : ‘तुमचा वर्धापन दिन आज नाहीच!’; शिवसेनेचा व्यंगचित्रातून शिवसेना उबाठावर हल्लाबोल)

फोनची बॅटरी इतकी मोठी असतानाही फोनचा आकार त्या मानाने स्लिम असाच आहे. फोनची जाडी अजिबात वाढलेली नाही. फोनचा डिस्प्ले ६.६७ इंचांचा असेल आणि एमोल्ड क्वाड कर्व्ह्ड डिस्प्ले असेल. तसंच रिफ्रेश रेट १२० हर्टर्झचा असेल. विवोने आपल्या आधीच्या टी३ फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर वापरला होता. पण, आता कंपनीने टी४ साठी स्नॅपड्रॅगन सातव्या पिढीतील प्रोसेसर वापरला आहे. तर हा फोन अँड्रॉईड १५ प्रणालीवर आधारित असेल. फोनचा कॅमेरा सोनी आयएमएक्स सेन्सर असलेला ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल. वाईड फोटोंसाठी २ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेराही असेल. तर सेल्फी कॅमेराही ३२ मेगा पिक्सेलचा असेल. फोनचे अनेक फोटो आतापर्यंत लीक झाले आहेत आणि त्यानुसार, फोनचं डिझाईन हे आकर्षक आणि आधुनिक असल्याचं दिसतंय. (Vivo T4 Ultra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.