PM Modi Visit To Croatia : क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं ‘वेजडिन संस्कृत ग्रामर’ ; या पुस्तकाची खासियत काय ?

PM Modi Visit To Croatia : क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं ‘वेजडिन संस्कृत ग्रामर’ ; या पुस्तकाची खासियत काय ?

74

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या क्रोएशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांना एक अमूल्य भेट देण्यात आली आहे. क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविज यांनी संस्कृत व्याकरणाचं पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं आहे. या पुस्तकाचं नाव ‘वेजडिन यांचं संस्कृत ग्रामर’ आहे.

या पुस्तकात भारत आणि क्रोएशिया यांच्या संबंधांचं तुलनात्मक वर्णन आणि विश्लेषण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाचा दौरा केला आहे. क्रोएशियाला जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

हेही वाचा-Iran-Israel conflict: अयातुल्लाह खोमेनींनी डोनाल्ड ट्रम्प यांचा बिनशर्त शरणागतीचा अल्टिमेटम फेटाळला !

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशियाची राजधानी जाग्रेब या ठिकाणी पोहचले. क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औपचारिक पद्धतीने स्वागत केलं. तसंच मोदींच्या स्वागतासाठी क्रोएशियात असलेले भारतीय नागरिकही मोठ्या प्रमाणावर आले होते. ‘मोदी मोदी’ आणि ‘भारतमाता की जय’ या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रोएशियातल्या काही भारतीयांशी संवाद साधला.

या पुस्तकाची खासियत काय ?
क्रोएशियाचे वैज्ञानिक आणि मिशनरी फिलिप वेजडिन यांनी संस्कृतबाबतचं हे पुस्तक १७९० मध्ये पहिल्यांदा लॅटिन भाषेत छापण्यात आलं होतं. फिलिप वेजडिन यांनी १७७४ मध्ये भारत दौरा केला होता. त्यानंतर ते मलबारचे व्हॉईस जनरल झाले. त्यांनी भारतात असताना हे पुस्तक लिहिलं होतं. फिलिप वेजडिन हे युरोपातले पहिले असे संशोधक होते ज्यांनी भारतीय भाषा आणि संस्कृती यांचा गांभीर्याने अभ्यास केला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.