Natural Disaster Relief : आपत्तीग्रस्तांना दिलासा! ४९ कोटींचा निधी मंजूर; विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश

61
Natural Disaster Relief : आपत्तीग्रस्तांना दिलासा! ४९ कोटींचा निधी मंजूर; विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश
  • प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे नुकसान झालेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत सर्व विभागीय आयुक्तांना तातडीने वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. (Natural Disaster Relief)

शासन निर्णय जारी; तातडीच्या मदतीसाठी पुढाकार

जाधव-पाटील म्हणाले, “आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत मिळेपर्यंत वेळ लागतो, त्यामुळे तातडीने निधी मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” या निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) नियमांनुसार प्रत्येक विभागासाठी निधीचे वाटप करण्यात आले आहे. (Natural Disaster Relief)

(हेही वाचा – उद्धव-राज एकत्र आले तरी धक्का बसणार नाही, भाजपाचा BMC Elections ‘गेमप्लॅन’ तयार!)

विभागनिहाय निधी वाटप कसे?
विभाग मंजूर निधी (रु. कोटीत)
कोकण
पुणे १२
नाशिक
छत्रपती संभाजीनगर १२
अमरावती
नागपूर १०
एकूण ४९
नुकसानग्रस्तांना तातडीचा दिलासा – मंत्री जाधव-पाटील यांचा विश्वास

मंत्री जाधव-पाटील म्हणाले, “नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित झालेल्या नागरिकांचे पंचनामे पूर्ण होऊन प्रस्ताव आल्यानंतर निधी वितरित करण्यात येईल. या निधीमुळे घरांची तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणी शक्य होईल.” (Natural Disaster Relief)

(हेही वाचा – Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध)

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे वादळ, पूर, ढगफुटीमुळे घरांची पडझड आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने आताच पुढाकार घेऊन निधीची तरतूद केल्यामुळे भविष्यातील आपत्तींना सामोरे जाण्यासाठी यंत्रणांना बळ मिळणार आहे. एकूणच, शासनाचा हा निर्णय आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी नवी आशा घेऊन येत आहे. (Natural Disaster Relief)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.