-
प्रतिनिधी
मालाड मालवणी परिसरातून अचानक बेपत्ता झालेला सराईत गुंड फहीम नजर सय्यद उर्फ फहीम मचमच याची हत्या (Murder) झाल्याचे उघडकीस आले आहे. मारेकऱ्यांनी त्याची हत्या करून मृतदेह मार्वे रोड येथील एका नाल्यात फेकला असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या तिघां मारेकऱ्यानी पोलिसांना दिली आहे. मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून फहीम मचमच याचा मृतदेहाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.
(हेही वाचा – Pakistani citizens : त्या ‘तीन’ पाकिस्तानींनी मुंबई सोडली; सर्व पाकिस्तानी अल्पकालीन व्हिसावर आले होते भारतात )
मालाड पश्चिम मालवणी परिसरात राहणारा स्थानिक गुंड फहिम नजीर सय्यद उर्फ फहिम मचमच (४२) हा १७ एप्रिल पासून अचानक बेपत्ता झाला होता. त्यांच्या पत्नीने मालवणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान भायखळा पोलिसांनी शुक्रवारी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मालवणात राहणारा गुंड फहिम मचमच याची हत्या करून मृतदेह मार्वे येथील नाल्यात फेकल्याची कबुली दिली. (Murder)
(हेही वाचा – भारताच्या सागरी क्षेत्राकरिता विझिंजम बंदर महत्त्वाचे; PM Narendra Modi म्हणाले, “यापुढे केरळमधील नागरिकांना…”)
दरम्यान भायखळा पोलिसांनी मालवणी पोलिसांकडे याबाबत चौकशी केली असता फहिम हा मागील दोन आठवड्यापासून बेपत्ता असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली. भायखळा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचा ताबा मालवणी पोलिसांना दिला. मालवणी पोलिसांनी आरोपीच्या दिलेल्या कबुली वरून त्याच्याविरुद्ध हत्येचा (Murder) गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या भावाने आणि दोन मित्रांनी मिळून फहिम ची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी मालाडच्या एका नाल्यात मृतदेह फेकला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community