केरळमध्ये ८ हजार ८०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, अदानी समूहाचे अध्यक्ष उद्योगती गौतम अदानी यावेळी उपस्थित होते. विझिंजम बंदराचे लोकार्पण म्हणजे भारताच्या सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदर म्हणजे सागरी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारताने घेतलेली लक्षणीय आघाडी आहे, असेही पंतप्रधान मोदींनी(PM Narendra Modi) सांगितले.
Mumbai-Goa Highway: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! 15 मे पासून करता येणार सुसाट प्रवास
केंद्र सरकारने विविध राज्य सरकारांच्या सहयोगाने सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांपर्यंत संपर्क सुविधा वाढवून बंदरांची पायाभूत कामे अद्ययावत केली असे सांगतानाच पंतप्रधान मोदी(PM Narendra Modi) म्हणाले, आजमितीस भारत सरकार आर्थिक सामर्थ्याची ही वाहिनी आणखी बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहे. भारतातील किनारी राज्ये आणि बंदराची शहरे विकसित भारताच्या वाढीची प्रमुख केंद्रे बनतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. बंदरनिर्मितीमुळे देशाबाहेर जाणारा पैसा आता यापुढे केरळ आणि विझिंजममधील नागरिकांना नवीन आर्थिक संधी निर्माण करेल, अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानां(PM Narendra Modi)नी दिली.
विझिंजम बंदराच्या लोकार्पणानंतर खोल पाण्यातील सागरी बंदर सुमारे ८ हजार ८०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आल्याचे सांगतानाच सागरी मालवाहतूक केंद्राची क्षमता येत्या काही वर्षांत तिप्पट होईल, त्यामुळे जगातील काही मोठी मालवाहू जहाजेही या बंदरातून सुरळितपणे ये-जा करू शकतील असेही पंतप्रधान मोदीं(PM Narendra Modi)नी स्पष्ट केले. भारताच्या एकूण सागरी मालवाहतुकीच्या ७५ टक्के मालवाहतुकीचे परिचालन याआधी परदेशी बंदरांतून केले जात असे. परिणामी, देशाला मोठ्या प्रमाणात महसूल गमवावा लागत होता, याकडेही पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.(PM Narendra Modi)
Join Our WhatsApp Community