वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील स्क्वेअर मॉलच्या क्रोमा शोरूममध्ये आग (Bandra Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Bandra Fire)
#WATCH | Maharashtra | A fire broke out at a showroom in Mumbai. Fire tenders are present at the spot, and operations are underway to douse the fire. No causality has been reported.
More details awaited. pic.twitter.com/nHEssi80eH
— ANI (@ANI) April 29, 2025
एमएफबीकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. एमएफबीच्या विनंतीनुसार, एनडीआरएफ तैनात करण्यात आले. एनडीआरएफची टीम सकाळी ७.५० वाजता पोहोचली. घटनास्थळावरून कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एमएफबीने आगीच्या ठिकाणाजवळील इमारत रिकामी केली आहे. (Bandra Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिमेकडील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या क्रोमा शोरूमला आग लागली असून यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही. (Bandra Fire)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community