Crime : वसईतील सिमेंट कंपनीत अमली पदार्थाची निर्मिती, ८ कोटींचा एमडी जप्त

63
Crime : वसईतील सिमेंट कंपनीत अमली पदार्थाची निर्मिती, ८ कोटींचा एमडी जप्त
Crime : वसईतील सिमेंट कंपनीत अमली पदार्थाची निर्मिती, ८ कोटींचा एमडी जप्त

मुंबई-वसईतील कामनगाव येथील सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या कंपनीत सुरू असलेला अमली पदार्थाच्या कारखाण्यात साकिनाका पोलिसांनी (Sakinaka Police) छापा टाकून ८ कोटींचा एमडी (MD) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. २०२३ पासून आतापर्यंत, साकीनाका पोलिसांनी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील ४५० कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs) जप्त केले आहेत आणि कारखाने उद्ध्वस्त केले आहेत, अशी माहिती डीसीपी सचिन गुंजाळ (Sachin Gunjal) यांनी दिली. (Crime)

२४ एप्रिल रोजी, साकीनाका पोलिसांच्या पथकाने विशिष्ट माहितीवरून कारवाई केली आणि साकीनाका येथील रेतीवाला कंपाउंडमधून २८ वर्षीय सादिक शेख (Sadiq Sheikh) याला ५३ ग्रॅम मेफेड्रोनसह अटक केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत १० लाख रुपये होती. शेख यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ६० तासांच्या आत वसईतील कामणगाव येथील एका कारखान्याचा शोध लावला. (Crime)

(हेही वाचा – IPL 2025, Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी आयपीएलमधील जलद शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीविषयी जाणुन घ्या सर्वकाही …)

सिमेंट ब्लॉक बनवण्याच्या नावाखाली, कारखान्याचा वापर मेफेड्रोन (Mephedrone) तयार करण्यासाठी केला जात होता. कारखान्यातून एक सेंट्रीफ्यूगल मशीन आणि दोन रेफ्रिजरेटर जप्त करण्यात आले. सेंट्रीफ्यूगल मशीन्सचा वापर द्रव पदार्थांना घन पदार्थात रूपांतरित करण्यासाठी केला जात होता तर रेफ्रिजरेटर्सचा वापर मंद थंड होण्यासाठी आणि घन पदार्थांना क्रिस्टल स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी केला जात होता. २६ एप्रिल रोजी कारखान्यातून ८ कोटी रुपये किमतीचे चार ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शेख व्यतिरिक्त पोलिसांनी सिराज पंजवानी (५७) आणि सय्यद इराणी यांना अटक केली. (Crime)

पंजवानी आणि इराणी यांचा एनडीपीएस कायद्यांतर्गत पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. हे तिघेही जण ड्रग्ज पुरवठा साखळीचा भाग होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, मीरा रोड येथील एक श्रीमंत व्यक्ती पंजवानी याला काळुराम चौधरी (Kaluram Chaudhary) नावाच्या एका व्यक्तीने ड्रग्ज (Drugs) पुरवले होते, जो सध्या फरार आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.