Pahalgam Attack Update: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेत वाढ पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सीएसएमटीसह मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील सुरक्षा (Railway Station Security) व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. लाखो लोक दररोज उपनगरीय रेल्वेवर अवलंबून असल्याने, प्रवाशांच्या सुरक्षेची जवाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. (Pahalgam Attack Update)
(हेही वाचा – Pakistan Army : भारताच्या कारवाईला पाकिस्तानी सैन्यही घाबरले; हजारो जवानांनी दिला राजीनामा)
रविवारी, रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी कुमार शुक्ला यांनी मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वाहतूक रेल्वेस्थानकापैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे व्यापक सुरक्षासंदर्भात आढावा घेतला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे स्थानकावर आता सीसीटीव्ही देखरेख वाढवली आहे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवली आहे. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफ, सरकारी रेल्वे पोलीस (GRP), महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) आणि श्वान पथकांकडून प्रमुख ठिकाणी नियमितपणे संयुक्त गस्त घातली जात आहे. ही गस्त केवळ सीएसएमटीवरच नाही तर चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण यासारख्या इतर प्रमुख स्थानकांवरही करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack च्या वृत्तांकनावर आक्षेप; केंद्र सरकार बीबीसीवर लक्ष ठेवणार)
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत (Mumbai Suburban Railway) १३९ स्थानके आहेत. तसेच या लोकल रेल्वेमधून दररोज ७.५ दशलक्षाहून अधिक प्रवाशांना सेवा मिळते. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त, लोकल मार्गावरही अधिक तपासणी केली जात आहे. श्वान पथके आता नियमितपणे डब्यांची तपासणी करतात आणि रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वे फलाटावर दोन तास आणि रेल्वे स्थानक परिसरात चार तास गस्त घालण्याचे आदेश देण्यात आहे. पहेलगाम हल्ल्यानंतर, सीएसएमटीसह मुंबई रेल्वे स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ आणि श्वान पथकांच्या संयुक्त गस्तसह सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात ‘फ्लॅश चेकिंग’ ऑपरेशन्स अंतर्गत तपासणी अधिक वारंवार होत आहेत. तसेच अधिकारी प्रवाशांच्या सामानाचे निरीक्षण आणि तपासणी करण्यासाठी लांब पल्याच्या गाड्यामध्ये श्वान पथकासह तपासणी करण्यात येत आहे.
हेही पहा –