PM Narendra Modi सौदी अरबच्या दौऱ्यावर; कोणत्या विषयावर होणार चर्चा?

62

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 22 एप्रिल 2025 ला सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) दोन दिवसीय दौऱ्यावर जेद्दाहला जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांची सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे.

(हेही वाचा – Waqf Amendment Bill : वक्फ बोर्डात गैर मुसलमान सदस्य का घेतले ? जेपीसी सदस्याने दिले उत्तर…)

हा दौरा भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील रणनीतिक भागीदारीला अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मोदी यांच्या तिसर्‍या कार्यकाळातील सौदी अरेबियाचा हा पहिला दौरा आहे. दोन्ही देशात व्यापार, ऊर्जा, संरक्षण, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि नागरिकांमधील संबंध सदृढ झाले आहेत. २०२३-२४ मध्ये द्विपक्षीय व्यापार ४३.३ अब्ज डॉलरपर्यंत पोहचले आहे. सौदी अरब हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तर भारत हा सौदी अरबचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी पार्टनर आहे.

कोणत्या विषयावर होणार चर्चा ?
  • भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये सौदी सैन्याला भारतीय सैन्याकडून प्रशिक्षण देण्याचा समावेश आहे.
  • दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य आणि व्यापाराला चालना देण्यासाठी नवीन करार होण्याची शक्यता आहे. 2023-24 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 42.98 अब्ज डॉलर इतका होता. आयएमईसी (IMEC): भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (India-Middle East-Europe Economic Corridor) या प्रकल्पावरही चर्चा होण्याची शक्यता आहे
  • भारतीय हज यात्रेकरूंच्या संबंधित मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष (Israel-Palestine conflict), रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war), या जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.