Polycab Share Price : पॉलीकॅबच्या शेअरमध्ये एका आठवड्यात ७ टक्क्यांची तेजी

Polycab Share Price : मॉर्गन स्टॅनली संस्थेनं पॉलीकॅब शेअरचं लक्ष्य वाढवलं आहे.

79
Polycab Share Price : पॉलीकॅबच्या शेअरमध्ये एका आठवड्यात ७ टक्क्यांची तेजी
  • ऋजुता लुकतुके

गेल्या महिनाभरात पॉलीकॅब वायर्स कंपनीच्या शेअरनी मोठे उतार चढाव पाहिले आहेत. आधी अदानी समुहाच्या या क्षेत्रातील प्रवेशाने फक्त पॉलीकॅबच नाही तर हॅवेल, केवाय, आरकेबल अशा सगळ्याच शेअरमध्ये घसरण झाली. ही घसरण एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात भरूनही निघाली आहे. खासकरून पॉलीकॅब इंडस्ट्रीजचे शेअर या आठवड्यात ७ टक्क्यांनी वाढले आहेत. तब्बल ३३१ अंशांची वाढ या शेअरमध्ये झाली आहे. (Polycab Share Price)

अखेर शेवटच्या दिवशी गुरुवारी हा शेअर १३ रुपयांच्या मामुली घसरणीसह ५,२८३ वर बंद झाला. पण, मागच्या महिनाभरात या शेअरमध्ये सुमारे २ टक्क्यांची आणि आठवड्याभरात तर ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. याला कारण आहे मॉर्गन स्टॅनली या जागतिक संशोधन कंपनीने पॉलीकॅब इंडस्ट्रीजचं वाढवलेलं लक्ष्य. हा शेअर येत्या ६ महिना ते वर्षभरात ५,७०० ची पातळी ओलांडेल असा त्यांचा अंदाज आहे. (Polycab Share Price)

(हेही वाचा – Infosys News : नारायण मूर्तींचा नातू एकाग्र भारतातील सगळ्यात छोटा कोट्यधीश)

New Project 2025 04 19T184312.051

पॉलीकॅब ही देशातील सगळ्यात मोठी केबल उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे २८ उत्पादक कारखाने भारतात कार्यान्वित आहेत. १९६४ पासून ही कंपनी या उद्योगात आहे. सुरुवातीला या क्षेत्रातील एकमेव भारतीय कंपनी असल्याचा फायदाही कंपनीला मिळाला. पण, पुढे पुढे स्पर्धा वाढली. सध्या कंपनीचा एकूण महसूल हा १,८०२ कोटी रुपयांच्या घरात आहे. आणि कंपनीत ४,००० च्या वर कर्मचारी कार्यरत आहेत. (Polycab Share Price)

शेअर बाजाराचा विचार केला तर पॉलीकॅब इंडियावर याच कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांचा चांगला विश्वास आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे शेअर ३२ टक्क्यांनी वाढले आहेत. तर म्युच्युअल फंड कंपन्यांनीही डिसेंबर २०२४ नंतर आपली या शेअरमधील गुंतवणूक ६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर नेली आहे. तर किरकोळ गुंतणूकदारांनीही या कंपनीत ३.५८ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. आताही मॉर्गन स्टॅनली या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थेनं शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. एकूण २५ संशोधन कंपन्यांनी पॉलीकॅबचा अभ्यास केला आहे आणि यातील १० जणांनी पॉलीकॅबमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. (Polycab Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.