IPL 2025, Rajasthan Royals : राजस्थान संघात दुफळी? राहुल द्रविड काय म्हणाला?

राहुल द्रविड आणि संजू सॅमसन यांच्यात बेबनाव असल्याची चर्चा होती.

105
IPL 2025, Rajasthan Royals : राजस्थान संघात दुफळी? राहुल द्रविड काय म्हणाला?
IPL 2025, Rajasthan Royals : राजस्थान संघात दुफळी? राहुल द्रविड काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) संघात कुठलीही दुफळी नसल्याचं पत्रकारांसमोर स्पष्ट केलं आहे. संघ सध्या या हंगामात यश मिळवण्यावरच विचार करत आहे. त्या बाबतीत सगळे खेळाडू एकत्र असल्यांचं द्रविडने ठणकावून सांगितलं. पण, खरंतर द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्यातच बेबनाव असल्याची बातमी आहे. ‘संजू आणि माझ्यात भांडण असल्याच्या चर्चा या निराधार आहेत,’ असं द्रविड शुक्रवारी म्हणाला.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यानंतर दोघांचा मैदानावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सुपर ओव्हरपूर्वीचा एक व्हिडिओ आहे. यात द्रविड सुपर ओव्हरमध्ये कोण फंलदाजी करणार हे ठरवत आहे. तो सहाय्यक प्रशिक्षकांशी चर्चा करतोय. तिथे असलेल्या एका खेळाडूने कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) चर्चेत सहभागी होण्याची विनंतीही केली. पण, त्याने मान वळवून चर्चेत भाग घेण्याचं नाकारलं, असं या व्हिडिओत प्रथमदर्शनी दिसतं. (IPL 2025, Rajasthan Royals)

(हेही वाचा – Rohit Sharma : वानखेडे मैदानात स्टँडला नाव दिलं गेल्यावर रोहित शर्माला कसं वाटतंय?)

(हेही वाचा – Water Shortage: अमर महल जंक्शन येथील जलवाहिनीला गळती: २४ तास पाणीपुरवठा बंद)

त्यानंतर दोघांमध्ये बेबनाव असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. पण, राहुल द्रविडने (Rahul Dravid) ही शक्यता फेटाळून लावली आहे. ‘ही बातमी कुणी पसरवली मला माहीत नाही. संजू आणि मी एकत्रच आहोत. संघाचा प्रत्येक निर्णय चर्चा करून घेत आहोत. जेव्हा संघाची कामगिरी आम्ही ठरवलेलं असतं, तशी होत नाही, तेव्हा आम्हाला टीकेचा सामना करावा लागतो. पण, अशा अफवांना आम्ही थांबवू शकत नाही. इतकंच सांगतो, संघातील वातावरण खेळीमेळीचं आहे. संघाची कामगिरी चांगली होत नसते, तेव्हा त्यांची मानसिकता काय असते हे बाहेरच्यांना समजणार नाही,’ असंही द्रविड (Rahul Dravid) यावेळी म्हणाला.

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ आता शनिवारी लखनौ सुपर जायंट्सशी (LSG) खेळणार आहे. आणि गुणतालिकेत हा संघ सध्या ४ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. (IPL 2025, Rajasthan Royals)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.