बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadanvis) या प्रकाराची गंभीर दखल घेतल्यानंतर नागपूर (Nagpur) विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. आता या बोगस शिक्षकांच्या (Bogus Teachers) बँक खात्यातील पगार जमा झाल्याच्या नोंदी तपासणार आहेत. नियुक्ती दहा वर्षांपूर्वी व पगाराची नोंद आताची असेल, तर नियुक्ती बोगस असण्यावर आपोआपच शिक्कामोर्तब होणार आहे. (Shalarth ID Scam)
(हेही वाचा – Heatwave : वाढत्या उष्ण लहरींना सामोरे जाण्यासाठी तयार रहा!)
नागपूर विभागात झालेल्या ५८० नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून, या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कमही वसूल केली जाणार आहे. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय व वेतन पथक कार्यालय अशा तीन कार्यालयांची साखळी असल्याचे दिसून आले. (education maharashtra)
‘सेटर’ने नियुक्तीचा प्रस्ताव आणला की, तीनही विभागांतील अधिकारी सहमतीने त्यावर निर्णय घ्यायचे, सर्वांचा हिस्सा ठरायचा व नियुक्तीला मंजुरी दिली जायची. माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्त करण्यासाठी प्रत्येकाकडून ३० ते ४० लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही रक्कम रोख स्वरूपात नियुक्तीच्या पूर्वीच घेतली जायची. रक्कम घेतल्यावर तिचे ठरल्यानुसार वाटप केले जायचे. (Shalarth ID Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community