-
ऋजुता लुकतुके
आयपीएल (IPL) संपल्या संपल्या काही दिवसांत भारताचा ए संघ इंग्लंडचा दौरा (India A Tour of England) करणार आहे. यात इंग्लंड लायन्स संघाबरोबर २ चार दिवसीय सामने आयोजित करण्यात आले आहेत. आणि इंग्लिश दौऱ्यातील आव्हान पाहता भारताचे काही ज्येष्ठ खेळाडू या दौऱ्यावर सरावासाठी जातील अशी चर्चा आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही (Gautam Gambhir) या दौऱ्यावर संघाबरोबर जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. भारतीय अ संघाच्या दौऱ्यात पहिला ४ दिवसीय सामना ३० मे ला कँटरबरी (Canterbury) इथं खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना ६ जूनपासून नॉर्दॅम्पयन इथं काऊंटी मैदानावर होणार आहे. तर भारतीय संघाचा दौरा २० जूनच्या हेडिंगले कसोटीने सुरू होणार आहे.
सध्या भारतात टी-२० लीग आयपीएल (IPL) सुरू आहे. आणि २०,२१ आणि २३ मे रोजी या लीगचे बाद फेरीचे सामने होणार आहेत. तर अंतिम फेरी २५ मेला होईल. भारताचे बहुतेक सर्व प्रमुख खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. पण, ही लीग संपल्यावर काही खेळाडू इंग्लंडला रवाना होतील असा अंदाज आहे. भारतीय अ संघात करुण नायरचा (Karun Nair) समावेश जवळ जवळ निश्चित आहे.
(हेही वाचा – Bangladesh मध्ये आतंकवादी हल्ल्यांची शक्यता; बांगलादेशी सैन्यदलप्रमुखांनी सेनादलांना केले सतर्क)
यंदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण (Karun Nair) चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आणि रणजी स्पर्धेत ९ कसोटींत त्याने ५४ च्या सरासरीने ८६३ धावा केल्या आहेत. त्याने सय्यद मुश्ताक अली ही टी-२० स्थानिक स्पर्धाही गाजवली आहे. त्यामुळे भारतीय ए संघातून पुढे भारतीय राष्ट्रीय संघात प्रवेश करण्याचाही त्याचा प्रयत्न असेल. विदर्भच्या रणजी विजयात यंदा करुण नायरचा (Karun Nair) मोठा वाटा होता.
आयपीएलच्या (IPL) बाद फेरीपूर्वी इंग्लंडसाठीच्या अ संघाची निवड होईल अशी शक्यता आहे. मुख्य राष्ट्रीय संघाच्या दौऱ्यात रोहित शर्माच (Rohit Sharma) भारताचं नेतृत्व करेल हे जवळ जवळ निश्चित आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सुमार कामगिरीनंतरही रोहितने आणखी खेळण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) तंदुरुस्तीवर मात्र सगळ्यांची नजर असेल. बुमराह पाठीच्या दुखापतीवर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत सध्या उपचार घेत आहे. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) मार्चमधील सामने तो खेळू शकणार नाहीए. इंग्लंड दौऱ्यापूर्वी तो तंदुरुस्त व्हावा अशीच भारतीय संघाची अपेक्षा असेल. (India A Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community