Babar Azam Record : बाबर आझम बनला टी-२० च्या इतिहासातील सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज 

Babar Azam Record : न्यूझीलंड विरुद्धची टी-२० मालिका बरोबरीत सोडवण्यात पाकला मोठी मदत बाबर आझमने केली 

167
Babar Azam Record : बाबर आझम बनला टी-२० च्या इतिहासातील सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज 
Babar Azam Record : बाबर आझम बनला टी-२० च्या इतिहासातील सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज 
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam Record) टी-२० क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज समजला जातो. नजाकतभरी तरीही वेगवान फलंदाजी करु शकणार फलंदाज अशी त्याची ख्याती आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० (T-20) मालिकेत बाबरने ४४ चेंडूंत ६६ धावा करताना पाकिस्तानला पावणे दोनशेचा टप्पा ओलांडायला मदत केली. त्याची ही खेळी आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरली. कारण, या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार लगावले. आणि त्या ओघात आयर्लंडच्या पॉल स्टिअरिंगला त्याने चौकारांच्या बाबतीत मागे टाकलं. (Babar Azam Record)

बाबर आझम (Babar Azam Record) आता आंतरराष्ट्रीय टी-२० (T-20) सामन्यांत सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर ४०९ चौकार जमा आहेत. आणि फक्त १०७ डावांत त्याने ही मजल मारली आहे. बाबर आणि स्टिअरिंग या दोनच फलंदाजांनी चारशे पेक्षा जास्त चौकार ठोकले आहेत. या दोघांच्या मागोमाग आहेत भारताचे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma).  (Babar Azam Record)

(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीची वॉर्नर आणि शिखर धवनच्या विक्रमांशी बरोबरी )

विराटच्या (Virat Kohli) नावावर १०९ सामन्यांत ठोकलेले ३६१ चौकार आहेत. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) १४३ सामन्यांत ३५९ चौकार ठोकले आहेत.  (Babar Azam Record)

बाबरच्या ६९ धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत न्यूझीलंडसमोर ५ बाद १७८ अशी धावसंख्या उभारली. आणि त्यानंतर शाहीन आफ्रीदीने ३० धावा देत ४ बळी मिळवून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या टॉम बंडेलने किवी डावाची चांगली सुरूवात केली होती. पण, आफ्रिदीने लागोपाठच्या चेंडूंवर घेतलेल्या दोन बळींमुळे किवी डावाची आगेकूच रोखली गेली. अखेर त्यांनी ८ धावा कमीच पडल्या. (Babar Azam Record)

(हेही वाचा- PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी दिलं तीन गोष्टींना प्राधान्य, वाचा काय म्हणाले पंतप्रधान ?)

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानची (New Zealand vs Pakistan) ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. यानंतर पाक संघ ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. (Babar Azam Record)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.