भाजपचे ईशान्य मुंबई (BJP’s Ishanya Mumbai) लोकसभा उमेदवार मिहिर कोटेचा (Lok Sabha candidate Mihir Kotecha) यांच्या प्रचार रथाची (Election Rally) रविवारी दुपारी मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंडमध्ये समाजकंटकांनी तोडफोड केली. कोटेचा म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Amedkar) यांच्या जयंतीदिनी अशी दुर्दैवी घटना घडली असून, “बाबासाहेबांनी मांडलेली लोकशाही मार्गाने लढाई लढण्याऐवजी विरोधक तरुणांची मने भडकवण्याचे आणि त्याला जातीय रंग देण्याचे भ्याड कृत्य करत आहेत. याचा मी तीव्र निषेध करतो. मी भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याची कळकळीची विनंती करतो,” असे विधान मिहिर कोटेचा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) च्या माध्यमातून केले.
(हेही वाचा – आरक्षण हटवणार नाही हटवू देणार नाही ; Amit Shah यांचे आश्वासन )
माझ्या प्रचाररथाची समाजकंटकांनी नासधूस केली. आज संविधानाची निर्मीती करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.अशा दिवशी त्यांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने लढाई लढण्यापेक्षा विरोधक तरूणांचे माथे भडकवून जातीयवादी रंग देण्याचे भेकड कृत्य करत आहेत. याचा मी निषेध करतो आणि आपल्या… pic.twitter.com/bTgUMJjps5
— Mihir Kotecha (Modi Ka Parivar) (@mihirkotecha) April 14, 2024
भाजपाचा बालेकिल्ला
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात उबाटा (UBT) गटाकडून संजय दिना पाटील (Sanjay Deena Patil) यांना उमेदवारी मिळाली आहे. मुलुंड आणि घाटकोपर हे मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community