आरक्षण हटवणार नाही हटवू देणार नाही ; Amit Shah यांचे आश्वासन

162
आरक्षण हटवणार नाही हटवू देणार नाही ; Amit Shah यांचे आश्वासन
आरक्षण हटवणार नाही हटवू देणार नाही ; Amit Shah यांचे आश्वासन

काँग्रेस खोटं बोलत आहे की, भाजपाला 400 जागा मिळाल्या, तर ते आरक्षण संपवून टाकतील. राहुल बाबा आमच्याकडे दोन टर्मपासून पूर्ण बहुमत आहे. याउलट आम्ही आमच्या बहुमताचा वापर कलम 370 हटवण्यासाठी केला. आम्ही आमच्या बहुमताचा वापर ट्रिपल तलाक संपवण्यासाठी केला. एवढेच नाही, तर आज मी -भंडारा-गोंदियातील जनतेला सांगून जात आहे की, जोवर भाजपा राजकारणामध्ये आहे. तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवूही देणार नाही. ही भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची गॅरंटी आहे,” असे आश्वासन भाजपा नेते अमित शाह यांनी प्रचारसभेत दिले. भंडारा जिल्ह्यात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

बहुमताचा वापर ट्रिपल तलाक संपवण्यासाठी केला

अमित शाह (Amit Shah) पुढे म्हणाले की, “राहुल बाबा आमच्याकडे दोन टर्मपासून पूर्ण बहुमत आहे. या उलट आम्ही आमच्या बहुमताचा वापर कलम 370 हटवण्यासाठी केला. आम्ही आमच्या बहुमताचा वापर ट्रिपल तलाक संपवण्यासाठी केला. काँग्रेस आज बाबासाहेबांचे नाव घेऊन मतं मागण्यासाठी घरोघरी फिरत आहे. 1954 च्या पोटनिवडणुकीत याच काँग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्याचे काम केले होते. हाच काँग्रेस पक्ष होता, ज्याने 5 दशकांपर्यंत सत्तेत राहूनही बाबासाहेबांना भारतरत्न दिले नव्हते. भाजपाने बाबासाहेबांशी संबंधित पाचही तीर्थस्थानांना विकसित करून बाबासाहेबांना अमर करण्याचे काम केले आहे.”

(हेही वाचा – Kolhapur Hatkanangle Lok Sabha : संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरात भेटीगाठी)

नक्षलवाद संपवला

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या दहा वर्षांत देशाला सुरक्षित, समृद्ध केलं. देशातील संस्कृतीला मजबूत बनवले. सर्जिकल व एअर स्ट्राईक करून मोदींच्या काळात दहशतवाद्यांना भीती निर्माण करून दिली. हे सर्व सुरक्षित देश करण्यासाठी मोदींनी केले आहे. नक्षलवाद संपवण्याचे काम मोदींच्या काळात झाले असल्याचेही शाह म्हणाले.

शाह म्हणाले, देशात गरीबी हटवण्याचे काम मोदींच्या काळात झाले. काँग्रेसने केवळ गरिबी हटवाचा नारा दिला, पण त्यांनी कधी गरीबी हटवली नाही. गरिबांना गरीब ठेवण्याचे काम केलं. पण मोदींच्या काळात हे चित्र बदलले आहे. गरिबांना धान्य मोफत दिले, तर पुढील पाच वर्षे देखील सातत्याने रेशन मोफत दिले जाणार आहे.

समृद्धी महामार्गामुळे भंडारा जिल्ह्यातील विकास झाला. तर भंडारा गोंदियापर्यंत समृद्धी महामार्ग वाढणार असल्याने येथील विकास अतिशय झपाट्याने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Amit Shah)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.