- ऋजुता लुकतुके
असं म्हणतात जेव्हा प्रयत्न करूनही हाती यश लागत नाही तेव्हा काहीतरी चमत्कारच बदल घडवू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) गुरुवारच्या सामन्यात तसा चमत्कार संघाचा मुख्य गोलंदाज रीस टॉपलीने क्षेत्ररक्षणात केला. इशान किशन (Ishan Kishan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोन्ही बाजूंनी धुवाधार फलंदाजी करत असताना, ही जोडी फोडायची तर कामगिरीतील चमत्कार आवश्यक होता. तेच रीसने करून दाखवलं. रोहित शर्माचा एकहाती आणि भन्नाट झेल टिपला. (IPL 2024, Mi vs RCB)
मुंबईच्या डावातील ते १२वं षटक होतं. यात जॅक्सचा लेग साईडला पडलेल्या चेंडूवर रोहित स्विपचा फटका खेळला. चेंडू बॅटची कड घेऊन उंच उडाला. टॉपलीच्या तो अवाक्याबाहेरच होता. पण, त्याने डाव्या बाजूला सूर मारून एकहाती हा झेल टिपला. चेंडू पकडल्यावर काही क्षण टॉपलीही नि:शब्द होता. त्याचाच विश्वास बसत नसल्यामुळे त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. (IPL 2024, Mi vs RCB)
WHAT A CATCH!
Reece Topley takes a blinder to dismiss Rohit Sharma.
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/wBAiSbBCoW
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
१९७ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनी (MI) तोपर्यंत १०१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा २४ चेंडूंत ३८ धावा करून खेळत होता. यात त्याने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकलेले होते. तर दुसरीकडे इशान किशनला (Ishan Kishan) आवरणंही कठीण जात होतं. त्याने ३४ चेंडूंत ६९ धावा केल्या. इशान आणि रोहीतची न फुटणारी जोडी फोडण्यासाठी टॉपलीचा हा अविश्वसनीय झेल कामी आला. (IPL 2024, Mi vs RCB)
(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 : यूपीतून भाजपाला 73 नव्हे तर पूर्ण 80 जागा हव्यात!)
विशेष म्हणजे रोहितने (Rohit Sharma) आयपीएलमध्ये सलामीवीराची भूमिका ९३ वेळा बजावली असली. तरी स्पर्धेतली त्याची ही पहिलीच शतकी सलामी होती. त्याला बाद करणारा टॉपलीचा झेल मात्र या हंगामातील सर्वोत्तम झेलांपैकी एक गणला जाईल. (IPL 2024, Mi vs RCB)