JCB Pattern : नेत्यांच्या स्वागताचा “जेसीबी पॅटर्न”

एक जेसीबी मशीन एका तासासाठी वापरायची असल्यास त्यासाठी तब्बल एक हजार रुपये खर्च करावे लागतात. शेतीच्या कामांमध्ये जेसीबी फार महत्त्वाचे असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात जेसीबी वापरतात. मजूर मिळत नसल्याने आणि अवघडात अवघड काम काही तासात पूर्ण करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जातो.

280
JCB Pattern : नेत्यांच्या स्वागताचा
JCB Pattern : नेत्यांच्या स्वागताचा "जेसीबी पॅटर्न"
पूर्वी नेत्यांचे स्वागत ढोल ताशा वाजवून तर कधी फटाके वाजवून केले जात होते परंतु मागील काही काळापासून एक नवा पॅटर्न महाराष्ट्रात रुजू झाला आहे. यामध्ये जेसीबी (JCB Pattern) मधून पुष्पवृष्टी करून नेत्याला खुश करण्याचा नवा पायंडा महाराष्ट्रात पडलेला दिसून येत आहे. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हे आपापल्या पक्षातील नेत्यांच्या स्वागतामध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहू नये यासाठी नेहमीच झटत असतात. त्यातच आगळे वेगळे स्वागत करण्यामधून आपले नेत्यासंदर्भातील असलेले भाव त्यातून कार्यकर्ते दाखवत असतात. यानंतरच नेते आपल्या कार्यकर्त्यांवर खुश होऊन त्यांना पुढे आणत असतात. यासाठीच कार्यकर्त्यांचा देखील नेत्यांसाठी केलेला हा काहीतरी मोठा अट्टाहास असतोच. त्यामुळेच की काय मागील काही वर्षांपासून “जेसीबी पॅटर्न” (JCB Pattern) रूढ झालेला दिसून येत आहे. (JCB Pattern)
पारंपारिक वेशभूषेत तर कधी ऐतिहासिक पद्धतीत स्वागताची पद्धत नेहमीच पाहण्यास मिळते. यामध्ये देखील काहीतरी हटके करून दाखवण्याची कार्यकर्त्यांची धडपड नेहमीच पहावयास मिळते. हार फुलांची उधळण असो किंवा तुतारी, ढोल-ताशे, नगारे वाजवून नेत्याचे स्वागत असो, तर काही वेळेस निरनिराळ्या वेशभूषेत आपल्या नेत्याचे जंगी स्वागत करून नेत्याला खुश करण्यासाठी कार्यकर्ते अनेक प्रयत्न करत असतात. यामध्ये देखील कार्यकर्त्यांचा कुठे ने कुठे स्वार्थ लपलेला असतोच. हे नेत्यांपासून देखील लपलेले नाही. (JCB Pattern)
“जेसीबी पॅटर्न” नक्की केव्हा सुरू झाला ?
एकंदर तसं पाहिल्यास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परळी विधानसभा क्षेत्रामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी डझनभर जेसीबी आणून जेसीबी वरून फुलांची उधळण करण्यात आली होती. त्यानंतर हाच पॅटर्न राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरला गेला असल्याचे चित्र समोर आले. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) देखील याच मराठवाड्यातून येतात. मराठवाड्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत जेसीबी मधून फुले उधळून करण्यात आल्याचे चित्र बऱ्याच दूरचित्रवाहिनी वरती दिसून आले आहे. जेसीबी बरोबरच क्रेनच्या माध्यमाने शेकडो किलोचे फुले असलेला हार आपल्या नेत्याच्या गळ्यात घालण्याची पद्धत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दिसून येते. नंतरच्या काळात हीच पद्धत राज्यभर अवलंबली गेली असल्याचे दिसून येते. (JCB Pattern)
काय आहे जेसीबी चा खर्च ?
एक जेसीबी मशीन एका तासासाठी वापरायची असल्यास त्यासाठी तब्बल एक हजार रुपये खर्च करावे लागतात. शेतीच्या कामांमध्ये जेसीबी (JCB Pattern) फार महत्त्वाचे असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात जेसीबी वापरतात. मजूर मिळत नसल्याने आणि अवघडात अवघड काम काही तासात पूर्ण करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जातो. बांधकामाच्या ठिकाणी देखील जेसीबीचा वापर केला जातो. पूर्वी मजूर किंवा बैलांच्या माध्यमातून शेतीची केली जात होती. नंतरच्या काळात आधुनिकीकरणानंतर याचा लाभ शेतीच्या कामात देखील करून घेण्यात आला. जमीन खोदणे तसेच मातीचे ढिगारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी जेसीबी (JCB Pattern) चा वापर केला जातो.
जेसीबी मधून पुष्पवृष्टी आणि चित्रीकरणासाठी माध्यमांची रेलचेल : 
आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या स्वागतासाठी जेसीबी मधून पुष्पवृष्टी (pushpvrushti) होणार आहे अशी बातमी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांना मिळाल्यास त्याचे विशेष कव्हरेज करण्यासाठी स्थानिक माध्यमांचे कॅमेरे मोठ्या प्रमाणात येतात अशी धारणा कार्यकर्त्यांमध्ये रुजू झाली आहे. तसेच जेसीबी मधून पुष्पवृष्टी चे चित्रीकरण हे माध्यमांसाठी देखील नाविन्यपूर्ण असल्याने जिल्ह्यामध्ये नेत्यांच्या स्वागतासाठी काही वेगळं केल्यास त्याला चांगली प्रसिद्धी मिळते हे गणित कार्यकर्ते देखील चांगलेच जाणून असतात. नेत्याप्रती कार्यकर्त्यांची असलेली भावना यामधून दाखवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेते जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांचे आगळे वेगळे स्वागत करण्याचा आटोकाट प्रयत्न कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जातो आणि त्यामधूनच समोर आला तो हा “जेसीबी पॅटर्न” …
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.