जैवविघटनशील कचऱ्याचा वापर कसा करायचा, प्लास्टिक कसे रिसायकल करायचे, पर्यावरणाची हानी कशी कमी करायची व वसुंधरेचे संवर्धन कसे करायचे यासाठी ” वेस्ट टू वेल्थ ” या संकल्पनेतून साकारलेले “द इको फॅक्टरी फाउंडेशन ” चे फिरते पर्यावरण रक्षक केंद्र देशभर ” पर्यावरण वाचवा जग वाचवा” अशी जनजागृती करणार असल्याची महिती फाऊंडेशनचे आनंद चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Environmental Protection Center)
मानव व पृथ्वी अशा विविध स्तरांवर शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने उपयुक्त ठरतील अशा शाश्वत जीवनशैली आणि पद्धती दाखवण्यासाठी शाश्वत भारत व पर्यावरण याचा समतोल राखण्यासाठी ही जनजागृती मोहीम महत्वाची आहे. पर्यावरण वाचवा म्हणजे नेमके काय करायचे हे सर्व नागरिकांना माहीत असेल असे नाही. त्यामुळे या जनजागृतीच्या माध्यमातून नेमके काय करायचे म्हणजे पर्यावरण रक्षण होईल हे सांगण्याचा प्रयत्न हे पर्यावरण रक्षण केंद्र भारतभर फिरणार आहे. (Environmental Protection Center)
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांचे मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी नुकतेच या केंद्राचे उद्घाटन केले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community