हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांत बदल होणार आहेत. याशिवाय राज्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण)
नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी :
वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम (Weather Update) देशासह राज्यात झाला असून विदर्भात (Vidarbha) आज म्हणजेच सोमवार २६ फेब्रुवारी रोजी ऑरेंज अॅलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता :
नागपूर वेधशाळेच्या माहितीनुसार (Weather Update) आज नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरातच राहण्याचे आवाहन वेधशाळेकडून करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करण्यात आली असून, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे तसेच स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar : रणछोडदासाची नव्हे तर नृसिंहाची पूजा आवश्यक!)
हिमालयीन प्रदेशात तुरळक पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता :
राज्यासह (Weather Update) देशातील हवामान पाहता, २६ फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. , २५ फेब्रुवारी ते १ मार्च यादरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात तुरळक पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community