Audi Q8 2024 : ऑडीची क्यू८ कार आहे स्पोर्ट्स बॅक

ऑडीच्या क्यू सीरिजमधली ही आठवी कार आणि तिची किंमत आहे १.१८ कोटी रुपये. 

199
Audi Q8 2024 : ऑडीची क्यू८ कार आहे स्पोर्ट्स बॅक
  • ऋजुता लुकतुके

ऑडी या जगप्रसिद्ध ब्रँडच्या क्यू सीरिजची ही आठवी कार आहे. आणि इंग्रजीतील ८ हे अक्षर इन्फिनिटी म्हणजे अनंत शक्यतांकडे घेऊन जाणारं आहे. तसंच काहीसं ऑडीच्या क्यू८ २०२४ गाडीचं आहे. म्हणजे ऑडी क्यू ८ या फेसलिफ्टने कंपनीला भारतात मोठं यश मिळवून दिलं आहे. १.१८ कोटी रुपयांची किंमत असूनही भारतात उत्तरोत्तर क्यू सीरिजने विक्रीचे नवनवे उच्चांक सर केले आहेत. आताही फेसलिफ्ट दिलेली गाडी असली तरी क्यू सीरिजमध्ये फारसे बदल कंपनीने केलेले नाहीत. फक्त क्यू८ ची इलेक्ट्रिक बहीण त्यांनी इ-ट्रॉन नावाने बाजारात आणली आहे. (Audi Q8 2024)

एरवी क्यू८ २०२४ चं इंजिन पेट्रोल इंजिन आहे. आणि या इंजिनातून ३४० अश्वशक्ती इतकी शक्ती निर्माण होते. तर गाडीत ८ स्पीड गिअर बॉक्स आहे. जो ऑटोमॅटिक श्रेणीतही उपलब्ध आहे. भारतात सध्या लोकप्रिय असलेल्या एसयुव्ही श्रेणीतील ही गाडी आहे. ० ते १०० किमींचा वेग ही गाडी ५.६ सेकंदांत गाठू शकते. (Audi Q8 2024)

(हेही वाचा – BJP चा हायटेक प्रचार; ‘चारशे’चे लक्ष्य साधणार)

गाडीची किंमत इतक्या कोटी रुपयांपासून सुरू

आधीच्या क्यू७ गाडीच्या तुलनेत क्यू८ च्या इंटिरिअरमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. पण, नवीन गाडी वूड (लाकडी लूक), ॲॅल्युमिनिअम आणि कार्बन फायबर अशा तीन प्रकारच्या इंटिरिअरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही बुकिंग करताना आपली आवड सांगून त्याप्रमाणे इंटिरिअर बनवून घेऊ शकता. क्यू सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे चालकाची सीट ही विमानाच्या कॉकपिटसारखी दिसते. समोर डिस्प्लेवर वेगवेगळ्या सूचना येत असतात. आणि अनेक सुविधा या कळ दाबली की उपलब्ध होतात. (Audi Q8 2024)

चालकाची सुरक्षा आणि सुविधा यासाठी हे महत्त्वाचं आहे. तशीच सुविधा नवीन गाडीतही आहे. गाडीत ६०५ लीटरची बूटस्पेस आहे. आणि अत्याधुनिक म्युझिक सिस्टिम आहे. गाडीच्या सीटही व्हेंटिलेटेड असून त्यात मसाजही शक्य होतो. अशा या ‘लोडेड’ गाडीची किंमत १.१७ कोटी रुपयांपासून सुरू होते. (Audi Q8 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.