BJP चा हायटेक प्रचार; ‘चारशे’चे लक्ष्य साधणार

भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत हायटेक पध्दतीने केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली जाणार आहे आणि तेच निवडणुकीचा चेहरा राहणार आहेत.

163
Lok Sabha Election 2024 : भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती जाहीर
Lok Sabha Election 2024 : भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती जाहीर
  • वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत हायटेक पध्दतीने करण्याची तयारी केली आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक गटातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, हे येथे उल्लेखनीय. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत हायटेक पध्दतीने केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली जाणार आहे आणि तेच निवडणुकीचा चेहरा राहणार आहेत. अशात, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती अगदी हायटेक पध्दतीने मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था भाजपने केली आहे. यासाठी भाजपने तब्बल २० हजारापेक्षा जास्त आयटी प्रोफेशनलची नियुक्ती केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे २२५ डाटा सेंटर देशभरात बनविण्यात आले आहेत. (BJP)

या विविध गटात मतदारांची विभागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दूरदृष्टीपणा आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची विभागणी लाभाथ्र्यानुसार करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज कार्यालयात मोदी सरकारच्या सुशासनाची माहिती मतदारांपर्यंत पोहचविली जाणार आहे. ही माहिती रिल्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, यासाठी पक्षाने शेकडो कंटेट रायटर, व्हिडीओ एडिटर आणि टेलेकॉलरची नियुक्ती केली असून ते २४ तास या सेंटरमध्ये तैनात राहणार आहेत. भाजप (BJP) या निवडणुकीत ‘तिसरी बार फिर मोदी सरकार’ आणि ‘अबकी बार चारसौ पार’ अशा घोषणा देत निवडणुकीच्या मैदानात उतरणाार आहे. चारशे खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याची योजना तयार करण्यात आली आहे. भाजपचा हायटेक प्रचार हा वेगवेगळ्या स्तरावर होणार आहे. देशभरातील मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. यात भाजपचे नवनियुक्त सदस्य, प्रथम मतदार, महिला मतदार, अल्पसंख्यांक समूह, आयटी प्रोफेशनल, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सेना तसेच निमलष्करी दलाचे जवान अशा विविध गटात मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. देशभरातील सर्व ५४३ जागांवर भाजपने स्वतंत्र प्रचार यंत्रणा बसवली आहे. (BJP)

मतदारांच्या या सर्व गटांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारच्या योजनांची माहिती रिल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलवर दिली जाणार आहे. जेणेकरून मतदारांना मोदी सरकारच्या पुन्हा का निवडून द्यायचे? या प्रश्नाचे उत्तर मिळेल. भाजपच्या प्रचारतंत्राची धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांभाळली आहे. अर्थात त्यांच्या मदतीला महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस आहेतच, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. भाजपने (BJP) प्रचारासाठी सद्य:स्थितीत जवळपास हजारो सिमकार्ड खरेदी केले आहेत. हे सर्व सिमकार्ड वेगवेगळ्या नावांवर असून त्यातील एकही सिमकार्ड खोट्या कागदपत्रांच्या आधारावर मिळविलेले नाही, हे विशेष. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येणार आहे, तसतशी सिमकार्ड आणि मोबाइल बिलांची संख्या वाढणार आहे. (BJP)

(हेही वाचा – Ford Mustang Mach E : मस्टँग मॅक ई सह फोर्ड कंपनीची भारतात परतण्याची तयारी)

या राज्यांवर प्रचारासाठी खास जोर

देशात सुरू असलेल्या ‘फाइव्ह-जी एअर फायबर ब्रॉडबॅन्ड’ वायरने जोडल्या जाणाऱ्या ‘ब्रॉडबॅन्ड’च्या सुमारे २ हजार ८८ जोडण्या सक्रिय झाल्या आहेत. देशभरातील मतदार संघांचा विचार केल्यास अंदाजे ३८ हजारावर कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब आणि मोबाइल वापरण्यात येत आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर, तेलंगण, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांवर प्रचारासाठी खास जोर देण्यात येणार आहे. भाजपकडून देशभरातील मतदारसंघांचे सर्वेक्षण आधीच करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित अनेक संस्थांनीही प्रत्येक मतदारसंघाचा कल जाणून घेतला आहे. अशात देशभरातील मतदारसंघानुसार पक्षाकडून प्रचारावर होणाऱ्या खर्चाची मर्यादा ठरविण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघातील स्थिती मजबूत आहे, तिथे खर्चासाठी तुलनेने कमी रक्कम मिळणार आहे. अधिक जोर लागणाऱ्या मतदारसंघांसाठी अर्थातच खिशाला ताण देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. (BJP)

भाजप यंदाच्या निवडणुकीत ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’चा सर्वाधिक वापर करणार आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हा एकच चेहरा ‘प्रोजेक्ट’ करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे सर्वच वरिष्ठ नेते सध्या देशभरातील मतदारसंघांचा दौरा करीत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाच्या विभागनिहाय बैठकींचे सत्र सुरू होणार आहे. या बैठकीत ‘हवेत गोळीबार नको, अगदी डिटेल आणि मायक्रो प्लानिंगचे प्रेझेंटेशन हवे’ असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. भाजपचे (BJP) दिवंगत नेते तथा माजी दूरसंचारमंत्री प्रमोद महाजन यांनी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना घरोघरी अटलींच्या आवाजात करून घेतलेल्या रेकॉर्डेड ‘फोनकॉल्स’ने भारतीय निवडणुकीच्या प्रचारात वेगळाच इतिहास रचला होता. ‘नमस्कार मै अटलबिहारी वाजपेयी बोल रहा हू..’ हे वाक्य आजही मतदारांच्या स्मृतीत आहेत. अशाच ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा वापर भाजप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी करणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रचारामागे भाजपचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन यांचे नाव घेतले जायचे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.