पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणजेच अटल सेतूचे आणि अन्य काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून एकप्रकारे राज्यातील लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले. हा विकासाचा मार्ग भाजपला आणि एकूणच महायुतीला किमान ११ लोकसभा मतदारसंघात (Loksabha) लाभ होऊ शकतो.
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ
यामध्ये थेट परिणाम होणाऱ्या मतदार संघात दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, कल्याण आणि रायगड यांचा समावेश आहे, तर अप्रत्यक्ष लाभ होणार आहे तो ईशान्य मुंबई, भिवंडी, पुणे अशा काही मतदार संघांचा (Loksabha) समावेश आहे.
घरांच्या किमती वाढणार
अटल सेतूमुळे मुंबई (शिवडी) ते नवी मुंबई, पनवेल, अलिबाग ते रायगड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत कापता येणार असून पुण्यात ९० मिनिटांत पोहोचता येईल. त्यामुळे दक्षिण मुंबई भागातून हा अटल सेतू सुरू होतो आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावात (न्हावाशेवा) जातो. त्यामुळेच त्याचा थेट परिणाम दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई आणि रायगड लोकसभेच्या (Loksabha) जागांवर होणार आहे, तसेच पुण्याला जाणाऱ्यांनाही यांचा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. या भागातील जमीन आणि घरांच्या किमतीत वाढ होणार असून रायगड जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाला चालना मिळू शकते.
दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन
दिघा गाव रेल्वे स्टेशन ठाणे जिल्ह्यात येत असून पंतप्रधान मोदींनी दिघा गाव रेल्वे स्टेशनचे लोकार्पण केले. त्याचा थेट लाभ ठाणे मतदार संघात होईलच, पण त्याला लागून असलेल्या ईशान्य मुंबई मतदार संघालाही होऊ शकेल. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवरील खार रोड ते गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गाचे लोकार्पण उत्तर-मध्य, उत्तर पश्चिम मुंबईत होणार आहे. खारकोपर-उरण रेल्वेसेवा, बेलापूर ते पेंधर ११.१० किमीचा मेट्रो मार्गाचे उद्घाटन, वसई-विरारसाठी आता मुबलक पाणीपुरवठा (उत्तर मुंबई) आणि ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भूमिगत मार्गाचे भूमिपूजनही केले ते दक्षिण मुंबईत येते.
‘या’ ११ Loksabha मतदार संघाचे विद्यमान खासदार
- दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (उबाठा)
- दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिवसेना-शिंदे गट)
- उत्तर-मध्य मुंबई – पूनम महाजन (भाजप)
- उत्तर-पश्चिम मुंबई – गजानन कीर्तिकर (शिवसेना-शिंदे गट)
- उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी (भाजप)
- ईशान्य मुंबई – मनोज कोटक (भाजप)
- ठाणे – राजन विचारे (उबाठा)
- कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना-शिंदे गट)
- रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
- पुणे – भाजपचे गिरीश बापट यांच्या निधनामुळे जागा सद्यस्थितीत रिक्त
- भिवंडी – कपिल पाटील (भाजप)
Join Our WhatsApp Community