Jammu and Kashmir : स्थानिक गुप्तचरांचे जाळे आणखी मजबूत करा; अमित शहा यांनी घेतला जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा

Jammu and Kashmir : सुरक्षा ग्रीडच्या कामकाजाचा आणि जम्मू आणि काश्मीरच्या एकूण सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतांना मंत्री शाह यांनी असुरक्षित भागात योग्य सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचा सल्ला दिला.

211
Jammu and Kashmir : स्थानिक गुप्तचरांचे जाळे आणखी मजबूत करा; अमित शहा यांनी घेतला जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा
Jammu and Kashmir : स्थानिक गुप्तचरांचे जाळे आणखी मजबूत करा; अमित शहा यांनी घेतला जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा

दहशतवादविरोधी कारवाई मजबूत करा. या कारवाई करतांना सर्व योग्य प्रक्रियांचा अवलंब केला जावा. दहशतवादाच्या परिसंस्थेचा संपूर्ण नायनाट करण्याची गरज आहे. स्थानिक गुप्तचरांचे जाळे आणखी मजबूत करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी निर्देश दिले आहेत. जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित प्रदेशात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी तेथील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

(हेही वाचा – Desert Cyclone : राजस्थानमध्ये भारत-युएईचा संयुक्त लष्करी सराव ‘डेझर्ट सायक्लोन’ सुरू)

नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA Ajit Doval), जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, लष्करप्रमुख, संचालक (आयबी), सीएपीएफचे (CAPF) प्रमुख, मुख्य सचिव आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे डीजीपी उपस्थित होते.

असुरक्षित भागात योग्य सुरक्षा यंत्रणा तैनात करणार

बैठकीदरम्यान अमित शहा यांनी दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांच्या क्षेत्रीय प्रभावशाली योजनेचा आढावा घेतला. सुरक्षा ग्रीडच्या कामकाजाचा आणि जम्मू आणि काश्मीरच्या एकूण सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतांना मंत्री शाह यांनी असुरक्षित भागात योग्य सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा दृष्टिकोन अवलंबत राहील, याचा पुनरुच्चार गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला.

(हेही वाचा – Numerical Roller : खोदलेले चर बुजविण्यासाठी वापरणार न्युमेरिकल रोलरचा वापर)

घुसखोरीचे प्रमाण कमी

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहशतवादाच्या विरोधातील लढाईचे कौतुक केले. दहशतवादाच्या घटनांमध्ये (Incidents of terrorism) लक्षणीय घट झाली आहे. तसेच घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे आणि कायदा – सुव्यवस्थेतील सुधारणा झाली आहे, यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. (Jammu and Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.