World Introspect Day: जागतिक अंतर्मुख दिवस!

बहुतेक अंतर्मुख लोक चांगले श्रोते असतात.

329
World Introspect Day: जागतिक अंतर्मुख दिवस!
World Introspect Day: जागतिक अंतर्मुख दिवस!

दरवर्षी २ जानेवारी हा दिवस जागतिक अंतर्मुख दिवस (World Introspect Day) म्हणून साजरा केला जातो. ‘अंतर्मुख होणे’ म्हणजे नेमके काय ? अंतर्मुख व्यक्तिंच्या स्वभावाचे पैलू जगासमोर येणे, त्यांच्या आंतरिक जगाविषयी जाणून घेणे, अशा व्यक्तिंविषयी समाजातील गैरसमज…याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.  जाणून घेऊया, हा दिवस साजरा करण्यामागील कारणे, महत्त्व आणि गरज ! याविषयी – 

खरं तर या जगात २ प्रकारचे लोक असतात. त्यातील एक म्हणजे असे लोक, ज्यांना कोणाशीही बोलायला, प्रवास करायला, मित्र जोडायला आवडतात; तर दुसरं म्हणजे जे लोक फार कमी बोलतात, ज्यांना एकटे राहायला आवडते आणि जे लोकं त्यांच्या खूपच कमी लोकांशी मनमोकळेपणाने संवाद साधतात. अशा लोकांना ‘अंतर्मुख’ म्हटले जाते.

(हेही वाचा – Gujarat Surya Namaskar : गुजरातने वर्षाच्या पहिल्या दिनी केला विश्वविक्रम; पंतप्रधानांनी केले ‘हे’ आवाहन )

विश्व अंतर्मुख दिवसाचा इतिहास…
पहिला जागतिक अंतर्मुख दिवस २ जानेवारी २०११ रोजी आयोजित करण्यात आला होता. मानसशास्त्रज्ञ आणि लेखक फेलिसिटस हेन यांच्यामुळे हा दिवस साजरा होऊ लागला. त्यांना वाटले की, २ जानेवारी ही सर्वात योग्य तारीख आहे, कारण अंतर्मुख लोक सहजपणे या दिवशी उत्साहाने वावरू शकतात आणि शांततेचा आनंद घेऊ शकतात. त्यांनी ठरवलेल्या योजनांवर प्रत्यक्षात आणण्यासाठी ते या दिवसापासून सुरुवात करू शकतात, या दृष्टीकोनातून २ जानेवारी हा दिवस विश्व अंतर्मुख दिवस साजरा होऊ लागला.

अंतर्मुख व्यक्तिंविषयी समाजात असलेले गैरसमज…
– अंतर्मुख लोकं लाजाळू असतात, असा गैरसमज समाजात या लोकांविषयी असतो, पण हे खरे नाही. लाजाळूपणा आणि अंतर्मुखता या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात लोकं कारणाशिवाय लाजत नाहीत.
– बहुतांश वेळा असाही गैरसमज असतो की, अंतर्मुख व्यक्तिंना कोणाशीही बोलायला आवडत नाही, मात्र सत्य हे आहे की, असे लोकांना त्यांच्या आवडीनिवडीविषयी सांगायला आवडते.
– अंतर्मुख व्यक्ती सामाजिक उपक्रमांपासून दूर राहतात, असाही गैरसमज या लोकांविषयी समाजात पसरलेला दिसतो. प्रत्यक्षात अंतर्मुख व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तिंप्रमाणेच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडते. अशा व्यक्तिंचा उत्साह व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते.
-लोकांचा या व्यक्तिंविषयी असा समज असतो की, अंतर्मुख व्यक्तिंना कोणाशीही मैत्री करायला आवडत नाही, तर प्रत्यक्षात अंतर्मुख लोकं कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत.
– बरेच लोक असेही मानतात की, ज्यांचे व्यक्तिमत्त्व अंतर्मुख असते असे लोक सर्जनशील असतात, मात्र सर्जनशीलतेचा अंतर्मुख आणि बहिर्मुख व्यक्तिमत्त्वाशी काहीही संबंध नसतो.

(हेही वाचा – NASA : २०२४ मध्ये ‘हे’ अंतराळयान सूर्यावर उतरणार! नासाकडून तारीख जाहीर)

तुम्ही अंतर्मुख आहात की बहिर्मुख? कसे ओळखाल?
– लोकांसोबत वेळ घालवल्यानंतर अंतर्मुखांना थकवा जाणवू शकतो किंवा त्यानंतर त्यांना एका जागी शांत बसून राहण्याची आवश्यकता भासते.
– अंतर्मुख व्यक्तींना एकांतात वेळ घालवायला आवडतं. ही गोष्ट त्यांच्यासाठी एखाद्या सर्वसामान्य गोष्टीप्रमाणेच असते, मात्र त्यांना नेहमीच एकटेही राहायचे नसते.
– अंतर्मुख व्यक्ती बऱ्याचदा मित्रमैत्रिणींच्या मोठ्या गटात सहभागी होण्यापेक्षा छोट्या गटात सहभागी व्हायला त्यांना आवडते.
– शांत स्वभावाच्या, इतरांना समजण्यास कठीण आणि त्यांच्या मनात काय सुरू आहे, हे पटकन न कळणाऱ्या, असे वर्णन अंतर्मुख व्यक्तिंबद्दल केले जाते.
– अंतर्मुखांसाठी खूप जास्त उत्तेजन त्यांना विचलित करते, ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते.
– अंतर्मुख व्यक्तिंना स्वत:ची व्यवस्थित माहिती असते. स्वत:ला ते चांगल्या पद्धतीने ओळखतात. भावना, प्रेरणा, जाणीवा आणि असुरक्षितता याविषयी त्यांना व्यवस्थित माहिती असते.
– अशा लोकांना नोकरी करायला आवडते. जिथे ते इतर लोकांसोबत स्वतंत्रपणे काम करू शकतात.

अंतर्मुख असण्याचे फायदे…
– अंतर्मुख होण्याचे अनेक फायदे आहेत. बहुतेक अंतर्मुख लोक चांगले श्रोते असतात. ते बोलण्यापूर्वी विचार करतात. असे लोकं इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात. अंतर्मुख व्यक्ती अतिशय चौकस असून त्या एखाद्या मुद्द्याबाबत सर्व अंगांनी विचार करतात.

जगप्रसिद्ध अंतर्मुख व्यक्तिमत्त्वे –
अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि कलाकार अंतर्मुख आहेत. सर्वात प्रसिद्ध अंतर्मुख व्यक्तिमत्त्वांमध्ये जे. के. रोलिंग, बिल गेट्स, अब्राहम लिंकन, एलेनोर रूझवेल्ट, कर्टेनी कॉक्स, अल्बर्ट आईन्स्टाईन, लॉरा बुश, रोझा पार्क्स, वॉरेन बफेट आणि रॉय रॉजर्स यांचा समावेश आहे.

जागतिक अंतर्मुख दिवस कसा साजरा कराल?
-संस्थापक फेलिसिटस हेन यांनी लिहिलेले ‘हॅप्पीली इंट्रोव्हर्टेड एव्हर आफ्टर’ हे विनामूल्य ई-पुस्तक डाउनलोड करून वाचू शकता.
– प्रसिद्ध अंतर्मुख व्यक्तिंबद्दल जास्तीत माहिती मिळवा. ती वाचून त्याचा तुमच्या आयुष्यात उपयोग करून घ्या.
– ‘हाऊ टू ट्रेन योर ड्रॅगन’, ‘द हॉबिट’, ‘द अॅव्हेंजर्स’ आणि ‘डेड पोएट्स सोसायटी’ या चित्रपटात अंतर्मुख पात्रांनी केलेली कामे पाहा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.