विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर (Ration Shopkeeper Strike) जाणार आहेत.
(हेही वाचा – Israel Hamas War : इस्रायलला शस्त्रविक्रीस बायडेन यांची मंजुरी; २४ तासांत १६५ पॅलेस्टिनी ठार)
आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल –
राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार (Ration Shopkeeper Strike) आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगितले जात आहे. मात्र सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने १ जानेवारीपासून पुकारलेल्या संपात (Ration Shopkeeper Strike) सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे. (Ration Shopkeeper Strike)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : ‘बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचं कोणीही नव्हतं’)
रेशन दुकानदारांच्या मागण्या
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, मार्जिन मनी ३०० रुपये करा, टू जी ऐवजी फोर जी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात (Ration Shopkeeper Strike) उपलब्ध करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community