WFI Election : ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड 

भारतीय कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीत अखेर बहुतेक जागा आणि पदं ब्रिजभूषण शरण यांच्या निकटवर्तीयांनीच जिंकली आहेत. शरण यांना विरोध करणारे कुस्तीपटू आता काय करणार? 

195
WFI Election : ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड 
WFI Election : ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची अध्यक्षपदी निवड 

ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्ती फेडरेशनच्या (WFI Election) बहुचर्चित निवडणुका अखेर गुरुवारी पार पडल्या. आणि यात काही कुस्तीपटूंचा विरोध असला तरी ब्रिजभूषण शरण यांचे निकटवर्तीय असलेले संजय सिंगच निवडून आले. शरण यांचे विरोधक खेळाडू या निर्णयामुळे नाराज आहेत. आणि ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू साक्षी सिंगने खेळ सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, त्याचवेळी फेडरेशनच्या निवडणुका झाल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय फेडरेशनने भारतीय संघटनेवर घातलेली बंदी उठवण्याची चिन्हंही निर्माण झाली आहेत.

संजय सिंग यांना ४० मतं मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रकूल पदक विजेत्या अनिता शेरॉन यांना ७ मतं मिळाली. शेरॉन यांच्या पॅनलमधील प्रेमचंद लोचब यांना सरचिटणीसपद मिळणार आहे.

निवडणुकीतील या निकालामुळे खेळाडूंचा एक गट मात्र कमालीचा नाराज झाला आहे. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिजभूषण शरण यांच्यावर कुस्तीपटू महिलांचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. ब्रिजभूषण शरण यांच्यावर कारवाईसाठी खेळाडू जंतर मंतर इथं उपोषणाला बसले होते.

(हेही वाचा-ATS Raid : एटीएसच्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात)

आताही संजय सिंग हे ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असल्यामुळे ते निवडून आले तर कुस्ती संघटनेच्या कारभारावर ब्रिजभूषण यांचाच प्रभाव राहणार हे कारण देत या खेळाडूंनी संजय सिंग यांना विरोध केला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही साक्षी मलिक, बजरंग पुनिया या खेळाडूंनी पत्रकार परिषद घेत संजय सिंग यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर साक्षीने कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली आहे.

त्याचवेळी कुस्ती फेडरेशनच्या निवडणुका झाल्यामुळे एक प्रश्न सुटणार आहे. युनायटेड कुस्ती फेडरेशन या कुस्तीच्या जागतिक संघटनेनं निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे भारतीय फेडरेशन निलंबित केली होती. आणि भारतीय कुस्तीपटू भारतीय ध्वजाखाली खेळू शकत नव्हते. हे निलंबन लवकरच हटू शकतं.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.