-
ऋजुता लुकतुके
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघ (Indian team) उत्सुक नाही. त्यामुळे चिडलेल्या पाक बोर्डाने (Pak Board) आयसीसीकडे (ICC) दाद मागितील आहे. (Champions Trophy Cricket)
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेवरून आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) रागाचा कडेलोट झालेला आहे. त्यांनी आयसीसीकडे (ICC) शेवटची दाद मागताना, भारतीय संघ (Indian team) या स्पर्धेत खेळला नाही, तर पाक बोर्डाला (Pak Board) नुकसान भरपाई तरी द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. (Champions Trophy Cricket)
पुढील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ मध्ये पाकिस्तानला व्हायची आहे. पण, सुरक्षिततेच्या मुद्यावरून भारताने ही स्पर्धा खेळायला नकार दिला आहे. त्यावरून पाक क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात गेली दोन वर्षं वादविवाद सुरू आहेत. इतकंच नाही तर पाक बोर्डाला स्पर्धेचं यजमानपद मिळालं असलं तरी त्यांच्याबरोबर आयसीसीने अजूनही आयोजनाचा करार केलेला नाही. (Champions Trophy Cricket)
या दोन गोष्टींमुळे पाक बोर्ड (Pak Board) सध्या भडकलंय. पाक बोर्डाचे अध्यक्ष अश्रफ झका आणि सीओओ नासिर सलमान यांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यान झालेल्या भारत-पाक सामन्याच्या वेळी आयसीसीच्या (ICC) अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चाही केली आहे. (Champions Trophy Cricket)
(हेही वाचा – Assembly Elections : अपक्ष उमेदवारांचे नशिबही फडफडणार!)
भारताने खरंच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला नकार दिला तर पाकला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी पाकने केल्याचं समजतंय. पाटीआय या वृत्तसंस्थेनं पाक बोर्डातील (Pak Board) सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. (Champions Trophy Cricket)
तर बीसीसीआयने (BCCI) भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळावं की नाही, याचा निर्णय केंद्र सरकारच (Central Govt) घेईल अशी भूमिका जाहीर केली आहे. भारत तसंच पाकिस्तान देशांनी २००७ पासून एकमेकांच्या देशात क्रिकेट दौरे केलेले नाहीत. अलीकडे आशिया चषकातही केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) पाठवायला नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही संघातील सामने श्रीलंकेत भरवण्यात आले होते. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा प्रस्तावित आहे. (Champions Trophy Cricket)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community