Poshan Pack: गरिबांच्या आरोग्यासाठी ‘पोषण पॅक’; ‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन’ संस्थेचा अभिनव उपक्रम

कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल.

120
Poshan Pack: गरिबांच्या आरोग्यासाठी 'पोषण पॅक'; 'इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन' संस्थेचा अभिनव उपक्रम
Poshan Pack: गरिबांच्या आरोग्यासाठी 'पोषण पॅक'; 'इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन' संस्थेचा अभिनव उपक्रम

कुपोषण आणि दूषित हवामानाचा आरोग्यावर होणारा परिणाम दूर होण्याकरिता प्रत्येक नागरिकाने आहारात भाज्या, फळे इत्यादी पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. याकरिता ‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन’ या संस्थेअंतर्गत ‘पोषण पॅक’ (Poshan Pack) उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत आपण आपल्या ओळखीच्या किंवा परिसरातील गरिबांना आर्थिक मदत करण्याऐवजी त्यांना हा ‘पोषक पॅक’ दिल्यास त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य उत्तम राहू शकते. उदा. इमारतीचे वॉचमन, मोलकरीण, वाहनचालक ज्यांना आपण दिवसभरात भेटतो, ज्यांच्यासोबत आपण काम करतो, अशा व्यक्तिंना हा पोषण पॅक तयार करून तुम्ही देऊ शकता. या पोषण पॅकमध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, फळे तसेच पौष्टिक भाज्यांचा समावेश असेल.

(हेही वाचा – Ind vs Aus Final : दीपोत्सवातील लखलखाटात अनुभवा फायनल मॅच)

कुटुंबियांचे आरोग्य उत्तम असेल, तर ते दिवसभर करत असलेल्या कामावरही सकारात्मक परिणाम होईल, अशा पद्धतीने ‘पोषण पॅक’ हा उपक्रम भारतभरात राबवला गेला, तर कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. बलाढ्य आणि निरोगी भारताच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असेल. त्यामुळे या उपक्रमासाठी भारत विकास परिषद, विलेपार्ले शाखेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला माहिती दिली.

परिसरातील गरिबांना किंवा दिवसभरात आपली ज्यांच्याशी भेट होते असे काही ओळखीच्या लोकांना आर्थिक मदत करण्याऐवजी पोषण पॅक दिले, तर कुपोषणाची समस्या कमी व्हायला मदत होईल. अशा लोकांना आपण नेहमी जी भाजी विकत घेतो त्यामध्ये अजून थोडी जास्त भाजी विकत घेऊन त्यांना देऊ शकतो. भाजीविक्रेत्यांनाही या उपक्रमाची माहिती दिल्यास ते त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना याविषयी माहिती देतील, यासाठी या उप्रकमाला हातभार लावण्याचे आवाहन अविनाश धर्माधिकारी यांनी केले आहे.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी काय कराल?
ज्यांना ‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन’ संस्थेच्या ‘पोषण पॅक’ या संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, असे लोक त्यांच्या ऐपतीप्रमाणे दररोज, आठवडा, महिना किंवा पंधरा दिवसांनी भाजी खरेदी करून मंदिराबाहेर बसणारे, वाहनचालक, साफसफाई कामगार, मोलकरीण यांना ही भाजी देऊ शकतात. आपल्याकडे अनेक लोकं असे आहेत जे पैसे कमवत असले, तरी त्यांचे उत्पन्न कमी आहे. सध्याची वाढत्या महागाईमुळे आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश कमी आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. कुपोषण होते. वाढते हवामानाचे प्रदूषण यामुळे उद्भवणारे आजारपण उद्भवते. यावर उपाय म्हणून हा ‘पोषण पॅक’ दिल्यास व्यक्ती आणि पर्यायाने कुटुंबाचे आरोग्य सुधारायला मदत होऊ शकते. बऱ्याचदा भाजी विक्रेते त्यांना हव्या त्या किमतीला भाजीला विकली गेली नाही, तर ती टाकून देतात. त्यामुळे या उपक्रमाचा अनपेक्षित फायदा शेतकरी, भाजीविक्रेत्यांना निश्चितच होईल. या उपक्रमाअंतर्गत गरजू, गरीब व्यक्तिंना ‘पोषण पॅक’ देताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून आज या उपक्रमाची आवश्यकता आमच्या लक्षात आली, असे ‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन’ संस्थेच्या सविता राव यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले.

संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी…
डिजिटली या उपक्रमात सहभागी होण्याकरिता संस्थेच्या ‘https://www.poshanpack.com’या संकेतस्थळाला भेट द्या. गरजू गरिबांपर्यंत पौष्टिक भाज्या पोहोचवण्यासाठी नोंदणी करता येईल. या उपक्रमात अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी ही लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.