मान्सूनने निरोप घेतला, पण निरोप घेतानाही तो कोसळलाच नाही. त्यामुळे देशभरातच यंदा पावसाची तूट राहिली आहे. राज्यात आणि देशात यंदा मान्सून उशिराने आला. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. ऑगस्ट महिना वगळता राज्यात चांगला पाऊस झाला नाही. सर्व अपेक्षा परतीच्या पावसावर असताना परतीचा पाऊसदेखील चांगला झाला नाही. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. यामुळे आता शेतीसह पिण्याच्या पाण्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा नेहमीपेक्षा उशिराने मान्सून निरोप घेतला आहे. (Monsoon Update)
राज्यात आणि देशात यंदा मान्सून उशिराने आला. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. ऑगस्ट महिना वगळता राज्यात चांगला पाऊस झाला नाही. यामुळे सर्व अपेक्षा परतीच्या पावसावर होती. परंतु परतीचा पाऊस चांगला झाला नाही. यामुळे यंदा चिंता निर्माण करणारी परिस्थिती असणार आहे.
देशात पावसाची सरासरी ८६८.६ मिमी आहे. मात्र, यावर्षी ८२० मिमीच पाऊस झाला. २०२३ च्या चार वर्षांपूर्वी चांगला पाऊस झालेला होता. सामान्य आणि सामान्यपेक्षा चांगला पाऊस या चार वर्षांत झाला. परंतु आता सामान्यपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
(हेही वाचा : Nitin Gadkari : मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार, नितीन गडकरींची कबुली)
महाराष्ट्रातदेखील पावसाची मोठी तूट राहिली आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण ११.४ टक्के कमी राहिले आहे. कोकण वगळता इतर ठिकाणी परतीचा पाऊस झाला नाही. राज्यात सरासरीच्या ८८.६ टक्केच पाऊस झाला आहे. सामान्यपणे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर हा पाऊस सरासरी इतका समजला जातो. परंतु यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community