नेपाळमध्ये ३ ऑक्टोबरला दुपारी झालेल्या 6.2 तीव्रतेच्या भूकंपाने 2015 मध्ये राजधानी काठमांडूला झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपाची भयावह आठवण करून दिली आहे. (Earthquake in Nepal) उत्तराखंडजवळील पश्चिम नेपाळमधील बझांग जिल्ह्यातील अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. घरे कोसळली आहेत. काही ठिकाणी इमारतींचे काही भाग कोसळले आहेत. फक्त पाच किमी खोलीवर आलेल्या भूकंपाच्या तीव्रतेमुळे अनेक ठिकाणी धोकादायक दरडी निर्माण झाल्या आहेत. मोठ्या भेगांमुळे अनेक इमारतींच्या स्ट्रक्चरल फ्रेम्स उघड झाल्या. (Earthquake in Nepal)
(हेही वाचा – ICC World Cup : सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ग्लोबल अॅम्बेसिडर)
आज दुपारी पश्चिम नेपाळमध्ये 5.3 आणि 6.3 तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आले नसले, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. काठमांडू पोस्टमधील अहवालानुसार, 5.3 तीव्रतेचा पहिला भूकंप दुपारी 2:40 वाजता नोंदवण्यात आला, त्यानंतर बझांग जिल्ह्यात 3:06 वाजता 6.3 तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. भूकंपाचे धक्के नेपाळमध्येच नाही, तर भारतातील दिल्ली आणि आसपासच्या भागातही जाणवले. (Earthquake in Nepal)
मुख्य जिल्हा अधिकारी नारायण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे भूस्खलनाचे वृत्त आहे, त्यामुळे बझांग ते कैलानीला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, खोर्पे ते चैनपूर भागाकडे जाणाऱ्या रस्त्यालाही भूकंपाचा तडाखा बसला आहे. दरड कोसळल्याने हा रस्ताही बंद झाला असून, तो खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळ जगातील सर्वात भूकंपप्रवण क्षेत्र आहे. नेपाळमध्ये 2015 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला, ज्यात सुमारे 9,000 लोक मृत्युमुखी पडले, तर 22,000 लोक जखमी झाले. 8,00,000 हून अधिक घरे आणि शाळा इमारतींचे नुकसान झाले होते. (Earthquake in Nepal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community