Best Strike : सलग आठ दिवसांनंतर अखेर बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला

216
Best Strike : सलग आठ दिवसांनंतर अखेर बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला

बेस्ट सेवेच्या (Best Strike) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा संप सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार या कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य होताच संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत आज म्हणजेच मंगळवार ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री बैठक झाली. या बैठीकत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आगारातील कंत्राटी कर्मचारी एकत्र येत आझाद मैदानात याबाबत घोषणा केली आहे.

(हेही वाचा – Pollution : दिल्ली आणि मुंबई जगभरातील दहा प्रदूषित शहरांच्या यादीत)

बेस्ट कंत्राटी कामगारांच्या ‘या’ मागण्या मान्य

कामगारांचे ( Basic Salary ) पगार 18,000 ( अठरा हजार ) करण्यात येणार
कामगारांच्या वार्षिक रजा ( CL / SL / PL ) भरपगारी करण्यात येणार, प्रवास मोफत देणार
कामगारांना वार्षिक दिवाळी बोनस देण्यात यावा
कामगारांना साप्ताहिक रजा ही भरुन मिळणार
कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी यावर कंपन्याना सूचना देणार
गेल्या सात दिवसाचा पगार देणार

म्हणून बेस्ट कर्मचारी संपावर होते

पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप (Best Strike) पुकारला होता. हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला होता. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही संपावर गेले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.