रस्ते वाहतूक आणि रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी शहरांतर्गत मेट्रोची बांधणी करण्यात आली आहे. रेल्वेतल्या गर्दीपासून आणि रस्त्यावरच्या गोगांटापासून मेट्रो प्रवाशांना दिलासा मिळतो. या पाठोपाठा आता आणखी एक सुविधा मिळणार आहे. ही सुविधा ना रेल्वे प्रशासन देते आहे ना बेस्ट.
मिळणार एक्स्ट्रा कवच
मुंबईत नव्याने पूर्ण रुपात सुरू झालेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ च्या प्रवाशांना यापुढे एक विशेष सुविधा मिळणार आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना ५ लाख रुपयापर्यंतचे विमा कवच मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा मेट्रोवरील विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. या दोन्ही मेट्रोंचे संचालन मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) ही कंपनी करते आहे.
विमा वाचवणार आर्थिक संकट
– दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला कमाल १ लाख रुपये
– बाह्यरुग्णांसाठी १० हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई
– किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत कमाल ९० हजार रुपये
– कायमचे किंवा आंशिक अपंगत्व आल्यास ४ लाख रुपये
– अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये
(हेही वाचा – मुंबईकरांनो सावधान! ९५ टक्के मॅनहोल खुलेच)
मी सुद्धा सुरक्षित होणार
या विम्यामुळे नागरिक निश्चितपणे प्रवास करू शकणार आहेत. एमएमएमओसीडब्ल्यूनुसार या विमा योजनेचे संरक्षण त्यांनाच मिळणार आहे, ज्यांच्याकडे पुढील गोष्टी असतील.
- वैध तिकीट
- पास
- स्मार्ट कार्ड
- क्यूआर कोड
- वैध परवानगी
या परिसराला सुरक्षाकवच
हा विमा मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे. मेट्रो स्थानकाची इमारत, फलाट, स्थानक परिसरात
जर मेट्रो स्टेशन इमारतीच्या बाहेर दुर्घटना झाली तर नागरिकाला विमा योजनेचे संरक्षण मिळणार नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community