Jammu And Kashmir: अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; १० प्रवाशांचा मृत्यू, ५५ जखमी

103
Jammu And Kashmir: अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; १० प्रवाशांचा मृत्यू, ५५ जखमी
Jammu And Kashmir: अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; १० प्रवाशांचा मृत्यू, ५५ जखमी

अमृतसरहून कटराला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस ३०० फूट दरीत बस कोसळली आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ५५ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, हा अपघात जम्मूपासून जवळपास ३० किलोमीटर दूर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग, जज्जर कोटली क्षेत्रात झाला. या बसमध्ये वैष्णव देवीला जाणारे प्रवासी होते. हा अपघात मंगळवारी सकाळच्या दरम्यान झाला, ज्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून बचावकार्याला सुरुवात केली.

(हेही वाचा – अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा; मंगलप्रभात लोढांचा आदेश)

जम्मू एसएसपी, चंदन कोहली म्हणाले की, ‘जम्मूमध्ये झालेल्या या बस दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ५५ लोकं जखमी झाले आहेत. सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बचाव कार्य पूर्ण झाले आहे. एसडीआरएफ पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. बसमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी होते. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.