Ashtvinayak : अष्टविनायकाची यात्रा आता २४ तासांत पूर्ण करा

अष्टविनायकाची ही स्वयंभू गणपतींची आठ मंदिरे प्रेक्षणीय असून राज्यासह परराज्यातून तसेच देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे.

169
अष्टविनायकाची यात्रा आता २४ तासांत पूर्ण करा
अष्टविनायकाची यात्रा आता २४ तासांत पूर्ण करा

अष्टविनायकाची Ashtvinayak यात्रा आता २४ तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. ही सर्व धार्मिक स्थळे एकमेकांना जोडणाऱ्या २५२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) हाती घेतलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी अष्टविनायक Ashtvinayak एक आहे. अष्टविनायकाची ही स्वयंभू गणपतींची आठ मंदिरे प्रेक्षणीय असून राज्यासह परराज्यातून तसेच देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. परंतु, अष्टविनायकाच्या दर्शनादरम्यान मार्गांवरील अडथळ्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. त्यांचा हा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत व्हावा या हेतूने सार्वजनिक बांधकाम विभागाने अष्टविनायकांच्या Ashtvinayak स्थळांना जोडणाऱ्या २५२ किमी रस्त्यांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या रस्त्यांचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे.

(हेही वाचा BJP : भाजपनेही भाकरी फिरवली; नव्या कार्यकारिणीत कोणाला मिळाली संधी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.