राज्यातील सरकारी रुग्णालयांत औषधंच नाहीत.. रुग्णांचे हाल!

97

मुंबईसह राज्यातील जवळजवळ सर्वच रुग्णालयांमध्ये मार्चपासून टीटीची इंजेक्शन्स आणि अॅमाॅक्सिसीलीन या मुलभूत आणि जीवनावश्यक औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. मुंबईसह राज्यातील जवळजवळ सर्वच रुग्णालयांमध्ये औषधांची टंचाई असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या औषधांसाठी रुग्ण परिसरातील खासगी औषध दुकानांत जात आहेत. कोरोना ओसरल्यानंतर औषधांच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे सरकारी रुग्णालयांना आवश्यक साठा पुरवण्यात हाफकिन बायो फार्मा काॅर् संस्थेला अपयश आले.

खासगी औषधांच्या दुकानांपुढे रांगा

या संस्थेच्यावतीने केंद्रीय पद्धतीने आवश्यक औषधांची खरेदी केली जाते. 25 मार्च रोजी कालीप्रसाद रामलखन यांना कुत्रा चावल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे टीटी आणि अॅमाॅक्सिसिलीन ही औषधे नसल्याने त्यांंच्या नातेवाईकांना खासगी औषध दुकानापुढील रांगेत उभे राहावे लागले.

( हेही वाचा :पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे ईलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीत तब्बल 218 टक्क्यांची वाढ! )

रुग्णांची संख्या दुप्पट

कोरोना साथ ओसरल्यानंतर आता रुग्णालयांमध्ये अन्य आजारांच्या रुग्णांची रीघ लागत आहे. मुंबईतील जे जे रुग्णालयात येणा-या रुग्णांची संख्या फेब्रुवारीपासून दुप्पट झाली आहे.

माहिती देण्यास सांगण्यात आले आहे

हाफकिन बायो-फार्माच्या आयुक्तांना या प्रश्नात लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधीची उपलब्धतता आणि विकेंद्रीत औषधखरेदीबाबतच्या उपाययोजनांचा माहिती देण्यासही सांगण्यात आले आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.