…अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल,संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा

164

गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन भाजप नेते किरिट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात खडाजंगी रंगली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोपांची सरबत्ती लावली आहे. अशातच आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र फरार असल्याचा दावा केला आहे. तसेच, रविवारपासून राजभवनात सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत. जुन्या तारखेचे कागदपत्रे तयार करत आहेत. मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने यात पडू नये. देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

मुंबई पोलीस पकडणारच

संजय राऊत यांनी मिडीयाशी संवाद साधताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हा इशारा दिला आहे. एक माफिया गॅंग आता बोगस पुरावे तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो जर चुकीचे काम केले तर राजभवनाची उरलेली इभ्रतही संपेल. सोमय्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न होत आहेत. पण गुन्हेगार कुठेही असो मुंबई पोलीस त्यांनी पकडणारच, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा :राज्यातील सरकारी रुग्णालयांत औषधंच नाहीत.. रुग्णांचे हाल! )

सोमय्या पिता-पुत्र फरार

किरीट सोमय्या हे मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली, तरी सत्याचाच विजय होईल असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसीप्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.