उर्दू भाषा भवनाबाबत बाल आयोगाची महापालिकेला नोटीस, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

117

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयटीआयसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उर्दू भाषा भवन उभारले जात असून याला विधीमंडळात भाजपने तीव्र विरोध केला. याबाबत तक्रारही करण्यात आली होती. यामध्ये मुंबई महानगरपालिकेने मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा (आयटीआय) प्रकल्प बंद करून त्या जागेवर उर्दू भाषा केंद्राचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या तक्रारीची दखल बाल आयोगाने घेतली असून पुढील दहा दिवसांच्या आत या विषयाबाबत कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय बाल आयोगाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

( हेही वाचा : थर्टीफर्स्टला बॉम्बस्फोट होणार! निनावी कॉलमुळे मुंबईत खळबळ, धारावीतून एकाला अटक)

“महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि नवाब मलिक राज्याचे कौशल्य विकासमंत्री असताना भायखळ्याच्या आग्रीपाड्यातील ‘आयटीआय’ प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर उर्दू भाषा केंद्र बांधण्याचा घाट घालण्यात आला होता. नवाब मलिकांच्या खात्याने याबाबत तत्काळ पावले उचलत ‘आयटीआय’साठी आरक्षित असलेली जागा उर्दू भाषा केंद्रासाठी आरक्षित करणे आणि त्यासाठी तत्काळ १२ कोटींचा निधी देऊन काम सुरू करण्याचा निर्णय तत्कालिन ठाकरे सरकारने घेतला होता.

मुंबई महानगरपालिकेने मुलांसाठी आयटीआयचा प्रकल्प बंद करून त्या जागेवर उर्दू भाषा केंद्राचे बांधकाम सुरू केल्याच्या तक्रारीची दखल घेत मुलांच्या/विद्यार्थी हितासाठी कारवाई करण्याकरिता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. आयटीआय प्रशिक्षण केंद्र हे आगरी पाडा मुंबई येथे होणार होते, त्याकरिता भूखंडही राखीव ठेवण्यात आला होता. त्याच भूखंडावर आता उर्दू भवनचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रकल्प बंद करून लाखो मुलांचा विविध कौशल्य विभागातील रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेण्याचा हक्क हिरावून घेण्याच्या बेकायदेशीर निर्णयाबाबत तक्रार या विषयामध्ये राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे स्थानिक विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली असून येत्या दहा दिवसांच्या आत या विषयामध्ये कारवाई करुन अहवाल सादर करावा असे निर्देश बाल आयोगाने मुंबई महापालिकेला दिले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या काळात भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव व तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याठिकाणी उर्दू भाषा भवन बांधण्यासाठी महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करताना त्यामध्ये निधीची तरतूद केली होती. त्यानंतर या जागेवर उर्दू भाषा भवन बांधण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी यशवंत जाधव यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार कंत्राटदाराची नेमणूक झाल्यानंतर कामालाही सुरुवात केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.