मुंबई महानगरपालिकेने गोखले पूल किमान दोन वर्षांसाठी सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पूलाचा एक भाग 2018 मध्ये कोसळला होता. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग काढण्यासाठी पालिकेने वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे.
BMC ने दर सहा महिन्यांनी पुलांची तपासणी करण्यासाठी नियुक्ती केलेल्या कन्सलटन्सी फर्मने हा पूल धोकादायक आणि असुरक्षित असल्याचे मानले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करावा असे सुचवले आहे. संपूर्ण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी किमान दोन वर्षे लागतील. तोपर्यंत तो सर्व वाहतुकीच्या मर्यादेबाहेर राहील, असे एका अधिका-याने सांगितले.
( हेही वाचा: ठाकरे गटाचे नेते शरद कोळी पोलिसांना चकवा देत अज्ञात स्थळी रवाना; पोलिसांकडून शोध सुरु )
स्ट्रक्चरल क्रॅक तसेच आतील स्टीलदेखील गंजलेले
जुलै 2018 मध्ये याचा काही भाग कोसळल्यानंतर, BMC ने IIT- Bombay द्वारे मुंबईतील सर्व पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी अर्धा खुला ठेवण्यात आला होता, त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पश्चिम उपनगरात दर 6 महिन्यांनी पुलांचे ऑडिट करण्यासाठी नियुक्त केलेल्या SCG कन्सलटन्सी सर्व्हिसेसने सादर केलेल्या अहवालानुसार, सध्या कार्यरत असलेल्या गोखले पुलाच्या भागाला स्ट्रक्चरल क्रॅक आहेत आणि आतील स्टीलदेखील गंजले आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या तपासणीनंतर एससीजी कन्सल्टन्सीने गोखले पूल बंद करण्याची शिफारस केली होती.
Join Our WhatsApp Community