विद्यार्थ्यानं ‘भारत माता की जय’ म्हटलं म्हणून शिक्षकांनी झापलं अन्…

128

मध्यप्रदेश गुना येथील एका शाळेत विद्यार्थ्याने प्रार्थना झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली. या घोषणेनंतर एकच गोंधळ उडाला आहे. हा विद्यार्थी इयत्ता 7वीत असून या विद्यार्थ्याने दिलेल्या या घोषणेनंतर त्याच्या शिक्षकाने त्याची कॉलर धरली आणि त्याला खेचत मुख्यध्यापकाकडे नेण्यात आले, असा आरोप या विद्यार्थ्याने केला. इतकेच नाही तर विद्यार्थ्याला केवळ मुख्यध्यापकाने खडसावले. यासह या घोषणा घरी द्या इथे नाही, असे सांगितले.

(हेही वाचा – दिवाळी, छठपूजा संपवून परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; 11 जण ठार)

या घोषणेनंतर या विद्यार्थाला पुढील काही तास वर्गात डांबून जमिनीवर बसवले. याची माहिती मिळताच हिंदू नेते आणि पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला. मध्य प्रदेशातल्या गुना येथील क्राइस्ट सीनियर सेकेंडरी स्कूलच्या बाहेर लोक निदर्शने करू लागले आहेत. मोठ्या संख्येने लोकांनी या शाळेच्या बाहेर उभे राहून हनुमान चालिसा गायली, तसेच भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणानंतर शाळेतील दोन शिक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गुना येथील रहिवासी असलेल्या रोहित जैन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा क्राइस्ट स्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकतो. बुधवारी शाळेत प्रार्थनेनंतर त्याने ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली. या प्रकाराने उपस्थित शिक्षक संतापले. मुलाला जमिनीवर बसण्याची शिक्षा देण्यात आली आणि त्याला धमकावले. या गोष्टीचा मुलाच्या मनावर इतका परिणाम झाला की घरी आल्यानंतर त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. यानंतर पालकांनी लगेच त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मुलाने संपूर्ण प्रकार सांगितला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.