सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आता तरुणी आणि महिला कोणताही विधिनिषेध न बाळगता चिअर्स करण्याची संधीच शोधत असून, नारी जातीतही व्यवनाधीनता वाढते आहे. चक्क राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानेच यावर बोट ठेवले आहे. सध्या हे प्रमाण कमी असले तरी मेट्रो सिटीतील लोन सर्वत्र पोहोचले आहे. बदलती लाइफ स्टाईल चिंतेचा विषय ठरते आहे.
राज्यात 15 ते 49 वयातील व्यक्तींमध्ये दारु पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात सध्यातरी महिलांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत त्यात वाढ होत आहे. त्यातही ग्रामीण भागातील महिलांपेक्षा शहरातील महिलांमध्ये दारुचे आकर्षण वाढले आहे.
( हेही वाचा: परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील ‘हे’ दोन निलंबित पोलीस पुन्हा सेवेत रुजू )
मुंबई, पुणे, सोलापूरपेक्षा औरंगाबाद जास्त ‘नशिले’
- मुंबई, पुणे व सोलापूर या शहरांना औरंगाबादेतील पुरुषांनी दारु पिण्यात चक्क मागे टाकले आहे. एकूण टक्केवारी पाहता औरंगाबादेतील 13.7 टक्के पुरुष दारु रिचवतात असे हा अहवाल म्हणतो.
- राज्यात 15 त 49 वर्षे या वयोगटात मद्यपान करणा-या पुरुषांचे प्रमाण 17.2 टक्के तर महिलांचे प्रमाण 0.2 टक्के आहे. ग्रामीण भागात महिलांमध्ये मद्यपानांचे प्रमाण 0.1 टक्के तर शहरी भागात 0.3 टक्के आहे.
का पितात महिला ?
- ताणतणाव, नैराश्य.
- सहज घेणे मग व्यसन जडणे
- मित्रांचा आग्रह, माॅडर्न लाइफ स्टाइलचा भाग म्हणून. पती घेतो म्हणून.
- पुरुषांची बरोबरी.