भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ, बावनकुळेंची घोषणा

109

भाजपमधील आक्रमक आणि फायर ब्रँड नेत्या चित्रा वाघ यांना आता पक्ष नेतृत्वाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चेंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे.

चित्रा वाघ यांच्या नावाची घोषणा

विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या जागी आता चित्रा वाघ यांची भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून चित्रा वाघ या महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडत आहेत. महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे यासाठी चित्रा वाघ झटत आहेत. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

(हेही वाचाः शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगितलं)

110 टक्के न्याय देणार

पक्षाने दिलेल्या या नव्या जबाबदारीला आपण 110 टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी महिला मोर्च्याचे अध्यक्षपद सिवीकारल्यानंतर दिली आहे. पूजा चव्हाण हत्याकांड प्रकरणात चित्रा वाघ यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच लव्ह जिहाद सारख्या महत्वाच्या मुद्द्यांविरोधात देखील त्यांनी आवाज उठवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.