आता Whatsapp वरुन डाऊनलोड करा लायसन्स,पॅन कार्ड आणि आधार कार्ड! फॉलो करा या स्टेप्स

201

सध्या एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी गप्पा मारणे, त्यांना व्हिडिओ कॉल करणे, इतकंच नाही तर पैशांचे व्यवहार देखील आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून करता येतात.

पण आता आधार कार्ड,पॅन कार्ड, मार्कशीट,ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी अत्यंत महत्वाची कागदपत्रे देखील आता आपल्याला व्हॉट्सअपवरुन डाऊनलोड करता येणार आहेत.

(हेही वाचाः ‘पुढील सामन्यांत के एल राहुल…’, मुख्य प्रशिक्षक द्रविडने राहुलच्या खराब फॉर्मबाबत स्पष्टच सांगितले)

असे करता येईल डाऊनलोड

  • Digilocker वर सेव्ह केलेली कागदपत्रे जसे की पॅन कार्ड,आधार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,मार्कशीट ही कागदपत्रे आता आपल्याला MyGov या व्हॉट्सअप चॅटबॉटद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.
  • त्यासाठी 9013151515 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. त्यानंतर या नंबरवर hi,digilocker किंवा नमस्ते असा व्हॉट्सअप करा.
  • त्यानंतर युजर्सना चॅटबॉटद्वारे डिजीलॉकर सर्व्हिसेस बद्दल विचारणा करण्यात येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांकाची माहिती विचारण्यात येईल.
  • ही माहिती दिल्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना OTP पाठवण्यात येईल.
  • यानंतर तुम्हाला Digilocker वर सेव्ह असलेली कागदपत्रे आपल्याला सहज डाऊनलोड करता येतील.
  • मात्र, ज्या युजर्सचे डिजिलॉकर अकाऊंट व्हॉट्सअप नंबरशी लिंक आहे त्यांनाच ही सेवा मिळू शकेल.
  • या सेवेमुळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपली कागदपत्रं डाऊनलोड करणे सोपे होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.