Veer Savarkar : राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

Veer Savarkar : थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती दिल्लीत महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

120
Veer Savarkar : राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
Veer Savarkar : राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

राजधानी दिल्ली येथेही स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची १४१ वी जयंती साजरी करण्यात आली. कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील (Maharashtra Sadan) सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदरसिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त  स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

(हेही वाचा – ‘मनुस्मृती’चे दहन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवा; Jitendra Awhad यांच्या वक्तव्यानंतर हिंदु जनजागृती समितीची मागणी)

महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन  

महाराष्ट्र परिचय केंद्रातही स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्‍यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.