Ice Cream : कमाल आहे बुवा; ‘या’ आईस्क्रीमच्या किंमतीत गावाला शेतजमीन विकत घ्याल

जपानमध्ये या आईस्क्रीमच्या एका कपाची किंमत 8 लाख 80 हजार येन एवढी आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 5 लाख 28 हजार 409 रुपये एवढी होते.

98
Ice Cream : कमाल आहे बुवा; 'या' आईस्क्रीमच्या किंमतीत गावाला शेतजमीन विकत घ्याल
Ice Cream : कमाल आहे बुवा; 'या' आईस्क्रीमच्या किंमतीत गावाला शेतजमीन विकत घ्याल
या सीझनमध्ये गर्मी एवढी वाढलीय की काही जण थंड पदार्थ खाण्यात रेकॉर्ड करतील. आईस्क्रीम हा असाच एक पदार्थ आहे जो उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ला जातो. आईस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही. लोक आपली आवडती आईस्क्रीम खायला कितीही किंमत मोजायला तयार असतात. तुम्हाला काय वाटते एक आईस्क्रीम किती महाग असू शकते? 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये? हो ना? पण आज आम्ही तुम्हाला आईस्क्रीमची जी किंमत सांगणार आहोत, ती किंमत ऐकून तुम्हाला चक्कर यायचीच तेवढी बाकी राहील. विश्वास नाही बसत ना? पण हे खरंय.. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात महागड्या आईस्क्रीमबद्दल सांगणार आहोत. या आईस्क्रीमच्या एका कपाची जी किंमत आहे तुला किमतीत तुमचा जवळजवळ पाच वर्षांचा घरखर्च निघेल.
या आईस्क्रीमचं नाव BYAKUYA असं आहे. ही महागडी आईस्क्रीम जपानमध्ये तयार केली जाते. जपानमध्ये या आईस्क्रीमच्या एका कपाची किंमत 8 लाख 80 हजार येन एवढी आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 5 लाख 28 हजार 409 रुपये एवढी होते. म्हणजे जर तुम्हाला संपूर्ण कुटुंबासाठी आईस्क्रीम खरेदी करायची असेल तर 12 लाख रुपये प्रतिकिलोच्या हिशेबाने किंमत मोजावी लागेल.
ही आईस्क्रीम सेलाटो नावाच्या जपानी ब्रॅण्डने तयार केली आहे. त्यांनी ‘व्हाईट नाईट’ असं या आईस्क्रीमचं नाव ठेवलं आहे. ही आईस्क्रीम तयार करण्यासाठी जपानी आणि युरोपियन व्यंजनांचा वापर केला गेला आहे, याच्या सजावटीसाठी त्यावर एक सोनेरी रंगाचे पान ठेवले जाते. तसेच या आईस्क्रीममध्ये एक ‘Sakekasu’ विशिष्ट पदार्थ वापरला गेला आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जवळपास दीड वर्ष इतका वेळ लागतो.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ही जगातली सर्वात महागडी आईस्क्रीम आहे. ही आईस्क्रीम तयार करण्यासाठी जपानमधील ओसाका येथील एका रेस्टॉरंटचे हेड शेफ तादायोशी यामादा यांची मदत घेतली होती. सध्या ही आईस्क्रीम फक्त जपानमध्येच मिळते. ऑनलाईन ऑर्डर केल्यास ही घरपोचही मिळते. तुम्हाला ही आईस्क्रीम खायला आवडेल का?
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.