सैनिकी शाळांचा कायापालट! CM Devendra Fadnavis यांचे शैक्षणिक सुधारणांचे मोठे पाऊल

69
प्रतिनिधी 

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सैनिकी शाळांना नवसंजननाचा मार्ग मोकळा झाला आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैनिकी शाळांच्या शैक्षणिक दर्जात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी सैनिकी शाळांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी धोरणात्मक बदलांची गरज व्यक्त केली. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Jammu and Kashmir मधील नादेर-त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू)

मुख्यमंत्र्यांनी समितीला सैनिकी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास, प्रवेश प्रक्रिया, सीबीएसई अभ्यासक्रम, निवासी सुविधा आणि शाळांच्या इतर मागण्यांचा सखोल आढावा घेऊन एका महिन्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. “राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभाग घ्यावा आणि शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्व आणि सांघिक भावनेने युक्त विद्यार्थी घडावेत, हा आमचा उद्देश आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सैनिकी शाळांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “समितीने प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. उत्तम शैक्षणिक व निवासी सुविधा, आधुनिक अभ्यासक्रम आणि आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी अहवालाच्या आधारे पुढील पावले उचलली जातील,” असे त्यांनी सांगितले.

सैनिकी शाळांचे धोरण नेतृत्वाभिमुख आणि राष्ट्रप्रेमी विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिकोनातून आखले गेले आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे सैनिकी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी बैठकीत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.